Join us

दातांवरील पिवळेपणा दूर करण्याचे 3 सोपे घरगुती उपाय, चारचौघात हसताना झाकावं लागणार नाही तोंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 10:43 IST

Teeth Whitening Home Remedies : आज आम्ही तुम्हाला दातांवरील पिवळेपणा घालवण्यासाठी काही सोपे आणि नॅचरल उपाय सांगणार आहोत. ज्याद्वारे तुमचे दात चमकदार आणि मजबूत होतील.

Teeth Whitening Home Remedies : पिवळ्या दातांची समस्या आजकाल भरपूर लोकांना होत आहे. दात पिवळे झाले की, मोकळेपणाने हसताही येत नाही आणि दिसायलाही चांगले दिसत नाहीत. इतकंच नाही तर पिवळ्या दातांमुळे आत्मविश्वासही कमी होतो. पिवळ्या दातांची समस्या दूर करण्यासाठी अशात वेगवेगळे उपाय केले जातात किंवा केमिकल्सचा वापर केला जातो. वेगवेगळ्या टूथपेस्टचा वापर केला जातो. पण यानं फायदा होण्याऐवजी नुकसान अधिक होतं. दात कमजोर होण्याचा धोका असतो. अशात आज आम्ही तुम्हाला दातांवरील पिवळेपणा घालवण्यासाठी काही सोपे आणि नॅचरल उपाय सांगणार आहोत. ज्याद्वारे तुमचे दात चमकदार आणि मजबूत होतील.

दातांवरील पिवळेपणा तुम्ही घरच्या घरी दूर करू शकता. हे घरगुती उपाय करून दात मोत्यांसारखे चमकदार होतील. असे काही उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. महत्वाची बाब म्हणजे हे उपाय करून तुमच्या दातांचं नुकसानही होणार नाही.

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस

दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस तुमची मदत करू शकतो. यासाठी चिमुटभर बेकिंग सोड्यामध्ये काही थेंड लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण ब्रशच्या मदतीनं दातांवर हलक्या हातानं फिरवा. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता. काही दिवसांमध्ये दातांवरील पिवळेपणा दूर होईल.

मोहरीचं तेल आणि मीठ

मोहरीचं तेल आणि मिठाच्या मिश्रणानं देखील दातांवरील पिवळेपणा दूर करण्यास मदत मिळते. यासाठी एक चमचा मोहरीच्या तेलात चिमुटभर सैंधव मीठ टाका आणि दातांवर बोटानं घासा. हा उपाय काही दिवस केल्यावर दातांवरील पिवळेपणा दूर होईल.

खोबऱ्याच्या तेलानं ऑइल पुलिंग

दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलानं ऑइल पुलिंग करणं सुद्धा फायदेशीर ठरू शकतं. ऑइल पुलिंग म्हणजे खोबऱ्याच्या तेलानं गुरळा करणं. यासाठी एक ते दोन चमचे खोबऱ्याचं तेल तोंडात टाका आणि 10 मिनिटं हे तेल तोंडात फिरवा. काही वेळानं तेल थुंका आणि पाण्यानं गुरळा करा. त्यानंतर ब्रश करा. यानं दात साफ होतील आणि तोंडाची दुर्गंधी सुद्धा दूर होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहेल्थ टिप्स