Lokmat Sakhi >Beauty > ओपन पोअर्समुळे चेहरा खराब दिसतो? गुलाबजल आणि ग्लिसरीन 'या' पद्धतीने लावा, पिगमेंटेशनही जातील 

ओपन पोअर्समुळे चेहरा खराब दिसतो? गुलाबजल आणि ग्लिसरीन 'या' पद्धतीने लावा, पिगमेंटेशनही जातील 

How To Get Rid Of Open Pores And Pigmentation: गुलाब जल किंवा रोज वॉटर आणि ग्लिसरीन हे दोन्ही पदार्थ त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. पण त्यांचा नेमका वापर कसा करावा, तेच अनेकांना समजत नाही..(use of rose water and glycerine for skin)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2025 12:33 IST2025-07-04T12:31:57+5:302025-07-04T12:33:15+5:30

How To Get Rid Of Open Pores And Pigmentation: गुलाब जल किंवा रोज वॉटर आणि ग्लिसरीन हे दोन्ही पदार्थ त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. पण त्यांचा नेमका वापर कसा करावा, तेच अनेकांना समजत नाही..(use of rose water and glycerine for skin)

how to get rid of open pores and pigmentation, home remedies for dry skin, home hacks for dark circles and dark lips  | ओपन पोअर्समुळे चेहरा खराब दिसतो? गुलाबजल आणि ग्लिसरीन 'या' पद्धतीने लावा, पिगमेंटेशनही जातील 

ओपन पोअर्समुळे चेहरा खराब दिसतो? गुलाबजल आणि ग्लिसरीन 'या' पद्धतीने लावा, पिगमेंटेशनही जातील 

Highlightsगुलाब जल आणि ग्लिसरीन एका खास पद्धतीने लावल्यास डार्क सर्कल्स आणि ओठांचा काळेपणाही कमी होऊ शकतो.

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुमच्याकडे खूप वेळ नसेल तर असे काही साधे सोपे उपायही तुम्ही करू शकता जे कमीतकमी वेळेत आणि कमीतकमी खर्चात तुमच्या त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यास मदत करतील. अशाच घरगुती उपायांपैकी एक आहे गुलाब जल आणि ग्लिसरीन यांचा वापर. हे दोन्ही पदार्थ तुमच्या त्वचेसाठी जणू काही जादू करतात. त्यांचा योग्य पद्धतीने वापर केला तर त्वचेवरचे ओपन पोअर्स, पिगमेंटेशन कमी होऊ शकतात (how to get rid of open pores and pigmentation?). एवढंच नाही तर ज्यांची त्वचा खूप कोरडी असते (home remedies for dry skin) त्यांच्यासाठीही हे दोन्ही पदार्थ एकत्र करून लावणं खूप उपयुक्त ठरतं. गुलाब जल आणि ग्लिसरीन एका खास पद्धतीने लावल्यास डार्क सर्कल्स आणि ओठांचा काळेपणाही कमी होऊ शकतो (home hacks for dark circles and dark lips). त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया..(how to use rose water and glycerine for skin?)

गुलाबजल आणि ग्लिसरीन त्वचेसाठी कशा पद्धतीने वापरावं?

 

१. त्वचेवर ग्लो येण्यासाठी 

त्वचा चमकदार करण्यासाठी १ चमचा ग्लिसरीन घ्या. त्यामध्ये ३ चमचे गुलाब जल, १ चमचा ॲलोव्हेरा जेल आणि व्हिटॅमिन ई चे ३ ते ४ थेंब टाका. हे मिश्रण एकत्र करा आणि दिवसातून एकदा हे क्रिम त्वचेवर लावून मसाज करा. काही दिवसांतच त्वचेवर ग्लो  आलेला दिसेल. 

सावळे सुंदर रूप मनोहर! आषाढीनिमित्त विठुरायाची मुर्ती घ्यायची? बघा विठोबाची वेगवेगळी मोहक रुपं..

२. ओपन पोअर्स आणि पिगमेंटेशन घालविण्यासाठी

ओपन पोअर्स आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा ग्लिसरीन घ्या. त्यामध्ये ३ चमचे गुलाब जल घाला. आता या मिश्रणात ३ चमचे काकडीचा रस आणि १ चमचा लिंबाचा रस घाला. या मिश्रणाचे आईस क्यूब तयार करा आणि दररोज एक बर्फाचा तुकडा घेऊन तो कापडात गुंडाळून त्वचेला मालिश करा. 

 

३. ओठांचा काळेपणा आणि डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी

ओठांचा काळेपणा आणि डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं कमी करण्यासाठी १ चमचा ग्लिसरीनमध्ये १ चमचा गुलाबजल घाला.

आषाढी एकादशी : विठुरायाच्या पुजेसाठी करा सुंंदर सजावट, ६ आयडिया- आकर्षक सजावट होईल झटपट

त्यामध्ये चिमूटभर हळद आणि १ चमचा बदामाचं तेल घाला. हा लेप रोज रात्री झोपण्यापुर्वी ओठांना आणि डोळ्यांभोवती लावा. काही दिवसांतच खूप छान परिणाम दिसेल. 
 

Web Title: how to get rid of open pores and pigmentation, home remedies for dry skin, home hacks for dark circles and dark lips 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.