Oily Skin Home Remedy: जेव्हा आपल्या त्वचेची रोमछिद्रे मोठी होतात आणि ऑइल प्रोडक्शन करतात तेव्हा त्वचा जास्त तेलकट दिसू लागते. अशात तेलकटपणा कमी करण्यासाठी पुन्हा पुन्हा चेहरा धुवावा लागतो. चेहरा तेलकट झाला तर अॅक्ने - पिंपल्सही येतात. आपणही नेहमीच चेहऱ्याच्या तेलकटपणाला कंटाळले असाल तर चिंता करू नका. इतकंच नाही तर महागडे प्रॉडक्ट्स वापरण्याचाही विचार करू नका. कारण काही घरगुती उपाय करूनही चेहऱ्याची ही समस्या आपण दूर करू शकता. महत्वाची बाब म्हणजे या उपायांचे काही साइड इफेक्ट्सही नाहीत. चला तर पाहुयात काय आहेत ते उपाय...
ज्येष्ठमधाची पावडर
ज्येष्ठमधाच्या पावडरमध्ये अँटी-इन्फ्लामेटरी आणि अँटी- बॅक्टेरिअल गुण असतात. ज्येष्ठमध हे थंड असतं. त्यामुळे त्वचेवर होणारी जळजळ, रेडनेस आणि डार्क स्पॉट कमी करण्यास मदत मिळते. तसेच त्वचेवरील एक्सट्रा ऑइलही कमी होतं. यासाठी १ चमचा ज्येष्ठमध पावडरमध्ये १ चमचा तांदळाचं पीठ आणि गुलाबजल घालून मुलायम पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.
चंदन पावडर
चंदनाची पावडर सुद्धा थंड असते. या पावडरमध्ये त्वचेवरील जास्तीचं तेल शोषून घेण्याची क्षमता असते. तसेच उष्णतेमुळे चेहऱ्यावर येणारी पुरळही कमी होते. त्वचा जास्त कोरडी होऊ नये यासाठी एक चमचा चंदन पावडरमध्ये २ चमचे कोरफडीचा गर मिक्स करा. याने त्वचा ड्राय होणार नाही आणि जास्त वेळ हायड्रेट राहण्यासही मदत मिळेल.
तांदळाचं पीठ
त्वचा आणि केसांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी खूप आधीपासून तांदळाच्या पिठाचा वापर केला जातो. तांदळाच्या पिठानं त्वचा चमकदार होते, तसेच हेल्दी होते. इतकंच नाही तर याने त्वचेवरील एक्स्ट्रा तेलही निघून जातं. यासाठी एक चमचा तांदळाच्या पिठात १ चमचा मध आणि गरजेनुसार गुलाबजल मिक्स करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा.
साखरेचा स्क्रब
जर आपल्याला चेहऱ्यावरील एक्स्ट्रा तेल साफ करायचं असेल, सोबतच पोर्सही क्लीन करायचे असतील तर साखरेचा स्क्रबसारखा वापर करू शकता. यासाठी अर्धा चमचा साखर घ्या, त्यात २ चमचे गुलाबजल मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. ५ मिनिटांनी चेहरा धुवा. चेहरा खोलवर साफ झालेला दिसेल आणि चमकदारही दिसेल.
