Join us

कपाळावरील सुरकुत्या लगेच होतील दूर, घरीच करा 'हे' स्वस्तात मस्त नॅचरल उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:58 IST

Forehead Wrinkles : महागडी उत्पादने वापरण्याऐवजी काही घरगुती उपायांनीही सुरकुत्या दूर केल्या जाऊ शकतात. असे काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Forehead Wrinkles : वय वाढण्याचा प्रभाव त्वचेवर लगेच दिसून येतो. मात्र, अनेकांना कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. ज्यामुळे चिंता वाढते. चुकीची लाइफस्टाईल, त्वचेची योग्य काळजी न घेणे आणि आहारात पोषक तत्वांची कमतरता यामुळे कपाळावर सुरकुत्या दिसू लागतात. अशात या सुरकुत्यांमुळे चेहऱ्याचं सौंदर्य कमी होऊ लागतं. अशात महागडी उत्पादने वापरण्याऐवजी काही घरगुती उपायांनीही सुरकुत्या दूर केल्या जाऊ शकतात. असे काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) पपईचा गर

पपई त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. पपईमध्ये पॅपेन नावाचं एंझाइम असतं. ज्याच्या मदतीने कपाळावरील सुरकुत्या दूर होतात. सुरकुत्या दूर करण्यासाठी १ चमचा पपईचा गर कपाळावर लावून स्क्रब करा. काही वेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ करा. हा उपाय नियमित करून कपाळावरील सुरकुत्या कमी होऊ शकतात.

२) खोबऱ्याचं तेल

खोबऱ्याचं तेल त्वचेला मॉइश्चराईज करण्यास मदत करतं. खोबऱ्याच्या तेलात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात जे त्वचेला निर्जीव करणाऱ्या आणि सुरकुत्याचं कारण असणाऱ्या अ‍ॅक्टिविटी कमी करतात. याचा वापर करण्यासाठी तेलाचे काही थेंब घेऊन कपाळाची मालिश करा. जोपर्यंत त्वचा तेल शोषूण घेत नाही तोपर्यंत मालिश करा. 

३) संत्र्याच्या सालीचं पावडर

संत्र्याची साल त्वचेसाठी अनेक दृष्टीने फायदेशीर ठरते. याचा वापर करण्यासाठी १ चमचा संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये १ चमचा गुलाबजल मिश्रित करा. हा फेसपॅक साधारण १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा. काही दिवसांमध्ये तुम्हाला सुरकुत्या दूर झालेल्या दिसतील.

४) अननसाचा रस

अननसामध्ये ब्रोमेलिन आणि व्हिटॅमिन असतात, जे कपाळावरील सुरकुत्या दूर करतात. याचा वापर करण्यासाठी अननसाचा ताजा रस काढून कापसाच्या मदतीने कपाळावर लावा. हा रस १५ मिनिटे कपाळावरच लावून ठेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा. काही दिवस हा उपाय केल्याने फरक दिसून येईल.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स