lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > डार्क सर्कल्स 2 मिनिटांत होतील गायब; शहनाज हुसैन सांगतात १ उपाय, चेहऱ्यावर येईल तेज

डार्क सर्कल्स 2 मिनिटांत होतील गायब; शहनाज हुसैन सांगतात १ उपाय, चेहऱ्यावर येईल तेज

Dark Circles Home Remedies : सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 03:30 PM2024-05-11T15:30:34+5:302024-05-11T19:23:50+5:30

Dark Circles Home Remedies : सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.

How To Get Rid Of Eyes Dark Circles With 5 Easy Home Remedies | डार्क सर्कल्स 2 मिनिटांत होतील गायब; शहनाज हुसैन सांगतात १ उपाय, चेहऱ्यावर येईल तेज

डार्क सर्कल्स 2 मिनिटांत होतील गायब; शहनाज हुसैन सांगतात १ उपाय, चेहऱ्यावर येईल तेज

डोळ्यांच्या खाली  काळी वर्तुळ येणं सौंदर्याच्या दृष्टीने फारच चुकीचे आहे. डार्क सर्कल्स वेळीच लपवले नाही तर  कमी वयातच चेहरा वयस्कर दिसू लागतो. त्वचा सुंदर दिसण्यासाठी आणि चेहरा क्लिन दिसावा यासाठी डोळे सुंदर दिसणं सुद्धा महत्वाचे असते. (How To Get Rid Of Eyes Dark Circles With 5 Easy Home Remedies) ज्यामुळे ताण-तणाव, झोपेची कमतरता, हॉर्मोनल परिवर्तन आणि खराब जीवनशैलीचा समावेश आहे. डोळ्यांची त्वचा संवेदनशील असते. काही नैसर्गिक उपायांचा वापर करून तुम्ही  त्वचेची काळजी घेऊ शकता. सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. (Dark Circles In Home Remedies)

किसलेला बटाटा किंवा किसलेली काकडी

हा एक प्रभावी उपाय आहे. थंड भाज्यांमध्ये व्हिटामीन, एंटीऑक्सिडेंट्स आणि सूज विरोधी गुणधर्म असतात. डोळ्यांच्या खालची सूज, पिग्मेंटेशन कमी करण्यास मदत होते. डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी हे उपाय फायदेशीर ठरतात. कच्चा बटाटा किंवा काकडीचा रसही फायदेशीर ठरतो. यासाठी बटाट्याचा रस भिजवून डोळ्यांवर  ठेवा. थंड पाण्याने धुतल्यानंतर  कमीत कमी 5 मिनिटांसाठी तसंच सोडून द्या.

टोमॅटो

टोमॅटोमध्ये एंटीऑक्सिडेंट्सबरोबरच प्राकृतिक ब्लिचिंग एजेंट् असते. डोळ्यांच्या खालचे डाग पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत करते. एक चमचा टोमॅटोच्या रसात एक चमचा लिंबू मिसळून याचा दोन्ही डोळ्यांच्या खाली लावा. थंड पाण्याने धुतल्यानंतर  10 मिनिटं तसंचू सोडून द्या. काळ्या वर्तुळांपासून बचाव करण्यासाठी टोमॅटोच्या रसात लिंबाचा रस किंवा पुदिन्याची पानं मिसळून पिऊ शकता. 

२ रूपयांची तुरटी नारळाच्या तेलाबरोबर लावा; पांढरे केस होतील काळे, तुरटीचे ५ भन्नाट फायदे

थंड दूध

थंड दूथ एक प्राकृतिक क्लिंजर आहे. थंड दूध आजूबाजूच्या नाजूक त्वचेला आराम देण्यास मदत करते. ज्यामुळे डोळ्यांची त्वचा मॉईश्चराईज राहते.  त्वचा मऊ रहाते. थंड दूधात कापूस लावून डोळ्यांच्या खालच्या भागात लावा.  त्यानंतर डोळे थंड पाण्याने  धुवा. काही मिनिटं तसंच लावलेलं राहू द्या. हे उपाय आठवड्यातून कमीत कम 3 वेळा करा. 

कंबर-पाठ खूपच दुखते? कॅल्शियमचा साठा आहेत ६ पदार्थ, रोज खा-२०६ हाडांना येईल ताकद

एलोवेरा जेल

एलोवेरा एक मॉईश्चराजरच्या स्वरूपात काम करते.  मॉईश्चराईज त्वचेमध्ये  लूजनेस येण्याची शक्यता असते एलोवेरा त्वचेला पोषण देते आणि वेळेआधी चेहरा वयस्कर होत नाही झोपण्याच्या आधी डोळ्यांच्या खाली  एलोवेरा जेल लावा  5 ते 7 मिनिटं मसाज करा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. 

ऋतिक रोशनच्या ट्रेनरनं सांगितलं वेट लॉस सिक्रेट; हे १ काम करा, पटापट वजन कमी होईल

थंड टी बॅग्स

डार्क सर्कल्स काढून टाकण्याची सगळ्यात चांगली टेक्निक म्हणजे थंड टि बॅग्सचा उपयोग करणं. चहातील टॅनिंग र्कत वाहिन्यांना संकुचित करण्यासाठी, रक्त प्रवाह कमी करण्यासाठी आणि काळी वर्तुळ कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

चांगल्या परिणामांसाठी तुम्ही कॅमोमाईड टी किंवा ग्रीन टी चा वापर करू शकता. बॅग पाण्यात भिजवून फ्रिजमध्ये ठेवा.  दोन्ही डोळ्यांवर १० ते १५ मिनिटांसाठी ठेवा. हा उपाय नियमित केल्यास चांगला परिणाम दिसून येईल. 

Web Title: How To Get Rid Of Eyes Dark Circles With 5 Easy Home Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.