Join us
Daily Top 2Weekly Top 5

काखेतील काळे डाग घालवण्यासाठी अघोरी उपाय सोडा-त्रास वाढेल, ‘हे’ ३ उपाय-देतील मनासारखा रिझल्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:01 IST

Dark Underarms Home Remedy : काही सोपे घरगुती उपाय नियमितपणे केल्यास काखेचा काळपटपणा कमी होऊ शकतो. चला तर मग हे उपाय जाणून घेऊया.

Dark Underarms Home Remedy : ब्लॅक अंडरआर्म्स म्हणजे काखेचा काळेपणा ही खूप सामान्य समस्या आहे. यामुळे अनेक मुलींना स्लीव्हलेस कपडे घालतानाही संकोच वाटतो आणि कधी कधी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून अनेकजणी वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरतात, पण हवा तसा फायदा मिळेलच असं नाही. मात्र काही सोपे घरगुती उपाय नियमितपणे केल्यास काखेचा काळपटपणा कमी होऊ शकतो. चला तर मग हे उपाय जाणून घेऊया.

लिंबू आणि बेकिंग सोडा

लिंबू नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे, तर बेकिंग सोडा त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतो. एक चमचा बेकिंग सोड्यात थोडा लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट काखेवर लावा, ५ मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. त्वचा सेंसिटिव्ह असल्यास लिंबाचा वापर सावधपणे करा.

बटाट्याचा रस

बटाट्यात सौम्य आम्लीय घटक असतात, जे त्वचेला जळजळ न होता उजळ करण्यास मदत करतात. बटाट्याचा तुकडा काखेवर चोळा किंवा बटाट्याचा रस काढून कापसाने लावा. १०–१५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

बेसन आणि दही

दह्यातील लॅक्टिक ॲसिड त्वचेचा रंग सुधारते, तर बेसन घाण आणि तेलकटपणा काढून टाकते. १ चमचा बेसन, १ चमचा दही आणि चिमूटभर हळद मिसळा. हा लेप काखेवर लावा, सुकल्यानंतर हलक्या हाताने चोळत धुवा.

खोबऱ्याचं तेल

खोबऱ्याच्या तेलात व्हिटॅमिन E असते, जे काळेपणा कमी करण्यास मदत करते. दररोज अंघोळीच्या १० मिनिटे आधी नारळाच्या तेलाने काखेची हलकी मसाज करा. यामुळे त्वचा मऊही राहते.

या गोष्टींची काळजी घ्या

शेव्हिंगऐवजी वॅक्सिंग करा: शेव्हिंगमुळे केस मुळासकट न निघाल्याने त्वचा काळी दिसू शकते. वॅक्सिंगमुळे मृत त्वचा देखील निघून जाते.

डिओड्रंट थेट त्वचेवर लावू नका: परफ्यूम किंवा डिओ थेट काखेवर स्प्रे न करता कपड्यांवर वापरा.

सैल कपडे घाला: खूप टाइट कपड्यांमुळे घर्षण वाढते आणि त्यामुळे त्वचा काळी पडू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Dark underarms? Try these simple remedies for effective results.

Web Summary : Black underarms are a common issue. Lemon, baking soda, potato juice, and coconut oil can help reduce darkness. Opt for waxing, avoid direct deodorant application, and wear loose clothing for best results.
टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स