Join us
Daily Top 2Weekly Top 5

डार्क सर्कल्स खूपच दिसतात? ५ पारंपरिक उपाय-घरातले बटाटे-टोमॅटो घालवतील काळी वर्तुळं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:19 IST

How To Get Rid Of Dark Circles : केमिकल्सयुक्त उत्पादनं वापरल्यामुळे चेहरा खराब होण्याची शक्यता असते. म्हणून साधे घरगुती उपाय करून पाहायला हवेत.

डार्क सर्कल्सशी समस्या आजकाल अनेकांना उद्भवते.  झोपेची कमतरता, रक्त कमी होणं या समस्यांमुळे डार्क सर्कल्स येतात. डार्क सर्कल्स एका दिवसांत कमी होत नाही. कोणताही उपाय सातत्याने केल्यास डोळ्यांमध्ये फरक दिसायला सुरूवात होते. (How To Get Rid Of Dark Circles Naturally)

केमिकल्सयुक्त उत्पादनं वापरल्यामुळे चेहरा खराब होण्याची शक्यता असते. म्हणून साधे घरगुती उपाय करून पाहायला हवेत. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या आपली आजी या पेजवरून कुसूम पाटील यांनी काही घरगुती उपाय शेअर केले आहेत.  हे उपाय सोप्या पद्धतीनं कसे करता येतील ते समजून घेऊ. (How To Get Rid Of Dark Circles)

१) ताजी कोरफड

 झोपताना ताज्या कोरफडीचा  गर काढून डोळ्यांखाली लावायचा आणि सकाळी चेहरा स्वच्छ धुवावा यामुळे डार्क सर्कल्स निघून जाण्यास मदत होते आणि डोळ्यांची त्वचा देखील चांगली राहते.

२) बटाटा

बटाट्याचे काप करून डोळ्यांवर ठेवा किंवा बटाट्याचा रस काढून डोळ्यांच्या खालील भागाला लावा आणि १० ते १५ मिनिटं तसंच ठेवा. नंतर डोळे स्वच्छ धुवा ज्यामुळे तिथल्या त्वचेचं टॅनिंग निघून जाण्यास मदत होईल.

३) गुलाब पाणी

गुलाब पाणी हा पदार्थ आहे तो प्रत्येकाच्या घरी असायलाच हवा. गुलाब जलाने डोळ्यांची मसाज करा नंतर डोळे स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या. 

४) बदाम तेल

रात्री झोपताना बदाम तेलानं डोळ्यांची मालिश करा. ज्यामुळे डोळे स्वच्छ आणि सुंदर दिसतील. बदाम तेल केसांप्रमाणे त्वचेसाठीही फायदेशीर ठरते.

५) टोमॅटो

टोमॅटोचा रस काढून त्यात लिंबू पिळून घ्या. हे मिश्रण डोळ्यांखाली लावा आणि १० ते १५ मिनिटांनी डोळे स्वच्छ धुवून घ्या.  हे घरगुती उपाय करण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट नक्की करून घ्या. ज्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. 

डार्क सर्कल्स येऊ नयेत यासाठी काय करावे?

 डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळ हटवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. जास्तीत जास्त झोप घ्या. डोळ्यांच्या खालचे डार्क सर्कल्स काढून टाकण्यासाठी तसंच डोळ्यांची सूज कमी थंड बर्फानं डोळे शेका.   काकडीचे छोटे तुकडे करून डोळ्यांवर ठेवा.

१ वाटी रव्याचे करा जाळीदार मऊसूत धिरडे; मुलांना डब्यात द्या- नाश्त्याला खा, सोपी रेसिपी

ज्यामुळे डोळ्यांची सूज कमी होण्यास मदत होईल आणि शरीराला व्हिटामीन सी मिळेल. थंड टी बॅग्स डोळ्यांच्या खाली ठेवू शकता ज्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते. कारण  यात कॅफेन आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Grandma's 5 remedies to remove dark circles and refresh your face.

Web Summary : Dark circles make the face look tired. Grandma suggests using aloe vera, potato, rose water, almond oil, or tomato. These home remedies help reduce dark circles. Getting enough sleep and using cold compresses are also beneficial.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी