डोळ्यांखाली काळी वर्तुळं (Dark Circles) येण्याची समस्या आजकाल प्रत्येकालाच उद्भवते. झोप कमी होणं, ताण-तणाव यामुळे चेहरा वयाआधीच म्हातारा दिसतो. डार्क सर्कल्स घालवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या ब्युटी ट्रिटमेंट्स घेतात तर काहीजण महागडे प्रोडक्ट विकत घेण्यात पैसे खर्च करतात (How To Get Rid Of Dark Circles). काही घरगुती सोपे उपाय तुमची मदत करू शकता. योग गुरू कैलाश बिश्नोई यांनी डार्क सर्कल्स घालवण्यासाठी घरगुती उपाय शेअर केले आहेत. (Dark Under Eyes Solution By Yoga Expert)
ज्यामुळे त्वचेवरील ग्लो पुन्हा येईल. चेहरा चमकेल आणि डोळ्यांची सुंदरताही वाढेल. रात्री उशीरापर्यंत स्क्रीन पाहणं, वाढता स्ट्रेस यामुळे चेहऱ्यावर डार्क सर्कल्स येतात. डार्क सर्कल्स घालवणाऱ्या क्रिम्स विकत न घेता काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही डार्क सर्कल्स कायमचे घालवू शकता.
डार्क सर्कल्स का येतात?
झोपेची कमतरता, वाढतं वय, जेनेटिक्स, एलर्जी, डिहायड्रेशन, जास्तवेळी स्क्रिन पाहणं, उन्हात जास्तवेळ जाणं या कारणांमुळे त्वचेवर डार्क सर्कल्स येतात.
डार्क सर्कल्स कमी करण्याचा खास उपाय
हा घरगुती उपाय करण्यासाठी तुम्हाला किचनमधलं साहित्य लागेल जसं की कच्च दूध, हळद, मध, कॉफी पावडर. सगळ्यात आधी एक वाटीत कच्चं दूध घ्या. त्यात हळद, मध, कॉफी पावडर मिसळून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट डोळ्यांच्या खालच्या वर्तुळात लावा १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. हा उपाय केल्यानंतर २ आठवड्यात चांगला परीणाम दिसून येईल.
डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी उपाय
1) कच्चं दूध- कच्चं दूध त्वचेला हायड्रेट ठेवतं आणि पोषण देतं.
2) हळद- हळदीत एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे सूज आणि काळेपणा कमी होतो त्वचा मॉईश्चराईज आणि सॉफ्ट राहते.
3) कॉफी पावडर-कॉफी पावडरमुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते आणि डार्कनेस कमी होतो.
या उपायांची खासियत अशी की कोणतेही केमिकल्स न वापरता नैसर्गिक पद्धतीनं चेहऱ्यावर ग्लो येतो आणि चेहरा ग्लोईंग दिसतो.
4) चेहरा चांगला दिसण्यासाठी स्क्रीन टाईम कमी करा. डोळ्यांना ताण येईपर्यंत टिव्ही पाहू नका. लॅपटॉप, पीसी वापरताना थोडा ब्रेक घेऊन मानेचे व्यायाम करा.