lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > डार्क सर्कल्समुळे चेहरा डल दिसतो? जुही परमार सांगते हा पदार्थ लावा, डार्क सर्कल्स होतील गायब

डार्क सर्कल्समुळे चेहरा डल दिसतो? जुही परमार सांगते हा पदार्थ लावा, डार्क सर्कल्स होतील गायब

How to Get Rid Of Dark Circles : डोळ्यांच्या खालची सूज कमी होते आणि डार्क सर्कल्स हलके होतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 03:14 PM2024-03-15T15:14:41+5:302024-03-15T15:16:58+5:30

How to Get Rid Of Dark Circles : डोळ्यांच्या खालची सूज कमी होते आणि डार्क सर्कल्स हलके होतात.

How to Get Rid Of Dark Circles : Coffee And Honey For Dark Circles How To Use Coffee For Dark Circles | डार्क सर्कल्समुळे चेहरा डल दिसतो? जुही परमार सांगते हा पदार्थ लावा, डार्क सर्कल्स होतील गायब

डार्क सर्कल्समुळे चेहरा डल दिसतो? जुही परमार सांगते हा पदार्थ लावा, डार्क सर्कल्स होतील गायब

डार्क सर्कल्स (Dark Circles Solution) म्हणजेच डोळ्यांखाली काळपट तर कधी हिरवट, निळे पॅचेच दिसून येतात. सतत ताण घेणं, झोप पूर्ण न होणं, एलर्जी याशिवाय काही औषधांमुळे अशी एलर्जी उद्भवते. डार्क सर्कल्स कमी करण्यासााठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. कॉफीमध्ये कॅफेन असते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढण्यास मदत होतो. (How to Get Rid From Dark Circles) डोळ्यांच्या खालची सूज कमी होते आणि डार्क सर्कल्स हलके होतात. डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी तुम्ही कॉफीचा वापर करू शकता. (Coffee And Honey For Dark Circles)

अभिनेत्री जुही परमाने इंस्टाग्रावर व्हिडिओ शेअर करत डार्क सर्कल्स कमी करण्याासठी उपाय सांगितले आहेत. कॉफी पावडरमध्ये मध घाला. हे मिश्रण एकत्र करून डार्क सर्कल्स असलेल्या ठिकाणी लावा. सुकल्यानंतर  हे मिश्रण स्वच्छ पाण्याने धुवून टाका. यामुळे मृत पेशी निघून जाण्यास मदत होईल आणि दात स्वच्छ चकचकीत दिसतील. 15 ते 20 मिनिटांनी चेहऱ्यावर ग्लो आलेला दिसेल. 

आलिया सांगतेय तिच्या ग्लोईंग त्वचेचं सोपं सिक्रेट; ६ स्किन केअर टिप्स; नाजूक-सुंदर दिसेल चेहरा

क्लिव्हलॅण्ड क्लिनिकच्या रिपोर्टनुसार काकडीचे तुकडे डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांचा पफीनेस कमी होतो आणि डोळे सुंदर दिसतात. यात पाणी आणि व्हिटामी सी चे प्रमाण जास्त असते.  डार्क सर्कल्स  लपवण्यासाठी तुम्ही हलका मेकअप करू शकता. ज्यामुळे चेहऱ्यावर फ्रेश फिल येतो.  डार्क सर्कल्सपासून बचाव करण्यासाठी उन्हाच्या संपर्कात येणं टाळा.

कॉफी पावडर आणि मध एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट डोळ्यांच्या खालच्या भागात लावा.  १० ते १५ मिनिटं सुकू द्या त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या तुम्हाला हा उपाय करायचा नसेल तर कॉफीची क्रिम बाजारात सहज उपलब्ध होईल. कॉफी बीन्स वाटून एक कॉम्प्रेस तयार करा. हे कॉम्प्रेस थंड पाण्यात भिजवून डोळ्यांच्या खाली ठेवा.  ज्यामुळे डार्क सर्कल्स दूर होण्यास मदत होईल आणि काही दिवसातंच फरक दिसून येईल.

 

१) डार्क सर्कल्स येऊ नयेत यासाठी ७ ते ८ तासांनी झोप घ्या. ज्यामुळे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत  होईल.

२) जास्तीत जास्त पाणी पित राहा. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहील. 

३) नियमित सनस्क्रिनचा वापर करा. ज्यामुळे चेहऱ्यावर काळपटपणा येणार नाही.

४) डोळे चांगले राहतात आणि डार्क सर्कल्सपासून बचाव होण्यास मदत होते. 

Web Title: How to Get Rid Of Dark Circles : Coffee And Honey For Dark Circles How To Use Coffee For Dark Circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.