आपल्यापैकी प्रत्येकीला आपली त्वचा कायम ग्लोइंग आणि चमकदार असावी असे वाटते. स्किन केअरच्या जगात नवनवीन ट्रेंड येत असतात, पण गेल्या काही वर्षांपासून 'कोरियन ग्लास स्किन' (Korean Glass Skin) ची क्रेझ सर्वांमध्येच पाहायला मिळत आहे. प्रत्येकाला आपली त्वचा काचेसारखी लख्ख आणि चमकदार असावी असे वाटते, जेणेकरून आपण अधिक आकर्षक व सुंदर दिसू(how to get korean glass skin naturally).
कोरियन स्किनकेअर रुटीन जगभर लोकप्रिय आहे आणि त्यामागचं सिक्रेट म्हणजे सौम्य, पोषण देणारे आणि त्वचेला नैसर्गिक चमक देणारे खास पदार्थ... यासाठी उकडवलेल्या भातापासून तयार होणारं “कोरियन फेशियल” सध्या ब्यूटी लव्हर्समध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. भातातील स्टार्च, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्वचेला (korean glass skin at home) खोलवर पोषण देतात, डलनेस कमी करतात आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो देण्यास मदत करतात. अगदी घरच्याघरी, कमी खर्चात आणि कोणतेही साइड इफेक्ट्स न होता उकडवलेल्या भातापासून चक्क कोरियन फेशियल कसं तयार करायचं आणि ते त्वचेसाठी ( homemade rice mask for glowing skin) कसं फायदेशीर ठरतं याच खास सिक्रेट पाहूयात.
घरच्याघरीच उरलेल्या भाताचे 'कोरियन फेशियल' करण्याचा नवा ट्रेंड...
शक्यतो, आपण एकदा तयार केलेला भात उरला तर आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करुन खातो किंवा फार फार तर दुसऱ्या दिवशी फोडणीचा भात करून खातो. परंतु हाच उकडलेला भात वापरुन आपण चक्क त्याचे घरगुती 'कोरियन फेशियल' झटपट तयार करू शकतो. उरलेल्या भाताचे 'कोरियन फेशियल' तयार करण्यासाठी आपल्याला, २ टेबलस्पून तांदूळ, १ ग्लास पाणी, स्किन ऑयली असेल तर १ टेबलस्पून दूध आणि ग्लो व हाइड्रेशनसाठी १ टेबलस्पून मध, १ टेबलस्पून गुलाबपाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
फक्त खोबरेल तेलचं नाही तर नारळाच्या शेंडया पण केसांसाठी वरदान! पाहा कसा करायचा उपयोग...
'कोरियन फेशियल' कसे तयार करायचे ?
सर्वात आधी थोडे तांदूळ घेऊन ते चांगले उकडवून घ्या,भात मऊ असावा. आता या उकडलेल्या भातात थोडे दूध (कोरड्या त्वचेसाठी) किंवा गुलाब पाणी (तेलकट त्वचेसाठी) मिक्स करा. यामध्ये एक चमचा मध घाला. आता हे सर्व मिश्रण मिक्सरला लावून किंवा हाताने मॅश करून त्याची एक स्मूद पेस्ट तयार करा. आता तुमचा 'कोरियन फेस मास्क' चेहऱ्याला लावण्यासाठी तयार आहे! तुमच्या वेळेनुसार आठवड्यातून २ ते ३ वेळा तुम्ही हा उपाय नक्की फॉलो करू शकता.
हे घरगुती कोरियन फेशिअल वापरण्याचे फायदे...
१. उकडलेला भात :- भातामध्ये असलेल्या नॅचरल स्टार्चमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा घट्ट आणि अधिक तरुण दिसण्यास मदत होते.
२. दूध :- दुधामध्ये असलेल्या 'लॅक्टिक' ॲसिडमुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि चेहऱ्याचा रंग नैसर्गिकरीत्या उजळतो. दुधामुळे त्वचेला खोलवर ओलावा मिळतो, ज्यामुळे चेहरा मऊ आणि मुलायम होतो.
३. मध :- मधामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग कमी करण्यास मदत करतात.
४. गुलाब पाणी :- जर तुम्ही गुलाबाचे पाणी वापरले, तर ते त्वचेचा pH स्तर संतुलित राखते आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल नियंत्रित करते. गुलाब पाणी त्वचेला थंडावा देते, ज्यामुळे त्वचेची जळजळ किंवा लालसरपणा कमी होतो.
