राजवाडी कड्यांचे डिझाइन्स पाहा, वाटेल कधी एकदा हातात घालावे! महाराणींसारखे दिसतील हात-कडे शोभतील सर्व ड्रेसेसवर...
Updated:January 20, 2026 17:26 IST2026-01-19T21:30:00+5:302026-01-20T17:26:43+5:30
Rajwadi Kangan Design for Wedding Season : rajwadi kangan for bride : rajwadi kade design latest : bridal rajwadi kangan design साडी असो वा डिझायनर लेहेंगा, किंवा एखादा सुंदर ड्रेस... या सगळ्यावर चार चाँद लावणारा दागिना म्हणजे राजवाडी कंगन...

लग्नसराई म्हटलं की नुसती साडी, लेहेंगा किंवा ड्रेस पुरेसा नसतो, तर त्या लुकला उठाव देणाऱ्या दागिन्यांची खरी जादू असते. लग्नसराईचे दिवस (Rajwadi Kangan Design for Wedding Season) म्हणजे पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा अनोखा संगम... या लग्नसराईच्या दिवसांत प्रत्येकीला सर्वात सुंदर, आकर्षक आणि चारचौघीत उठून दिसायचे असते. साडी असो किंवा डिझायनर लेहेंगा, किंवा एखादा सुंदर ड्रेस... या सगळ्यावर चार चाँद लावणारा दागिना म्हणजे राजवाडी कंगन किंवा कडा...
हे राजवाडी कंगन किंवा कडा फक्त हाताची शोभा वाढवत नाहीत, तर तुमच्या संपूर्ण (bridal rajwadi kangan design) लुकला एक शाही आणि पारंपारिक टच देतात.आजकाल बाजारात राजवाडी कंगनाचे विविध प्रकार उपलब्ध आहेत, जे तुम्ही कोणत्याही पारंपरिक किंवा फ्युजन आउटफिटसोबत सहज पेअर करू शकता. राजवाडी कंगन अशा दागिन्यांपैकी आहेत जे तुम्हाला साध्या पेहरावातही एखाद्या राणीसारखा फील देतात.
विशेषतः राजवाडी कंगन आणि कडा डिझाईन्स या पारंपरिक पण सदाबहार ज्वेलरी प्रकाराने कोणताही साडी किंवा इंडो-वेस्टर्न ड्रेस अगदी रॉयल लुकमध्ये बदलतो. लग्नसोहळ्यासाठी खास निवडक, साडीपासून ड्रेसवर शोभून दिसणाऱ्या, मनमोहक राजवाडी कंगन आणि कड्यांच्या डिझाईन्सची खास झलक...
हेव्ही नक्षीकाम, कुंदन, पोल्की, मोत्यांची जडणघडण आणि अँटिक फिनिशमुळे हे कंगन लग्न, रिसेप्शन, हळद किंवा साखरपुड्यासाठी परफेक्ट लूक देतात. खास बाब म्हणजे हे कंगन फक्त साडीवरच नव्हे, तर गाऊन, अनारकली, शरारा किंवा डिझायनर ड्रेसवरही तितकेच उठून दिसतात.
लग्नसराईत साडीची शोभा वाढवण्यासाठी केवळ दागिने असून चालत नाही, तर ते 'रॉयल' असावे लागतात. राजवाडी कंगन हे अशा दागिन्यांपैकी एक आहेत जे साध्या लूकही राजेशाही टच देतात.
पैठणी, कांजीवरम किंवा गडवाल साडीवर हे कडे उठून दिसतात. जर तुम्ही भरजरी साडी नेसणार असाल, तर दोन्ही हातात एक-एक मोठा कडा घालणे पुरेसे ठरते. काठापदराच्या साडीवर किंवा नऊवारी साडीवर हे कंगन अतिशय सुंदर दिसतात. हलक्या रंगाच्या ड्रेसवर किंवा पेस्टल साड्यांवर हे उठून दिसतात.
हे राजवाडी कंगन किंवा कडा दिसायला अत्यंत भव्य असतात, यावर बारीक कुंदन काम आणि रंगीत मीनाकारी (लाल, हिरवा किंवा निळा रंग) केलेली असते.
या कंगनवर देवी - देवतांची किंवा मोर, कमळ यांसारखी पारंपारिक कोरीव काम केलेले असते जे खूपच उठावदार आणि राजेशाही दिसते.
नेटच्या साड्या, डिझायनर लेहेंगा किंवा शरारा सूटवर हे खड्यांचे कडे अतिशय मोहक दिसतात.
कंगनाच्या खालच्या बाजूला लहान लहान मोत्यांचे घुंगरू लटकलेले असतात, जे हाताच्या हालचालीनुसार हलतात ते दिसताना फार सुंदर दिसते.
राजवाडी कंगनमध्ये हिरे किंवा पोल्की खड्यांचा वापर केला जातो. हे कडे अत्यंत महागडे आणि श्रीमंत लूक देणारे असतात. जर तुमचा लग्नाचा लेहेंगा किंवा साडी खूप जास्त भारी असेल, तर गळ्यात जड हार न घालता फक्त हे जड पोल्की कडे घातले तरी चालतात.
हे कडे विशेषतः राजस्थानच्या राजघराण्यातील परंपरेतून आले आहेत. यात मध्यभागी मोठे जडाऊ काम असते आणि कडांना सोन्याच्या बारीक तारांची नक्षी असते. याला तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाच्या बांधणी साडीवर ट्राय करा, लूक एकदम उठून दिसेल.
राजवाडी कड्याच्या दोन्ही बाजूला तुमच्या साडीच्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घाला. यामुळे पारंपारिक आणि ट्रेंडी असा दोन्ही लूक मिळतो.
लग्नाच्या गडबडीत दागिन्यांची निवड करताना कंगन हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. राजवाडी कड्यांचे सौंदर्य त्यांच्या 'बोल्ड' आणि 'रॉयल' लूक मध्ये असते.
सिल्क साड्या किंवा सिल्क गाऊनवर हे अँटिक कडे खूप छान मॅच होतात. विशेषतः साऊथ इंडियन लूकसाठी हे बेस्ट आहेत.