Join us

55 वर्षांच्या कोरियन आईनं सांगितलं चमकदार चेहऱ्याचं गुपित! ४ वस्तू लावते, वय दिसूनच येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 21:02 IST

How To Get Korean Glass Skin Naturally : बाजारातही कोरीयन प्रोडक्ट्स सगळ्यात जास्त विकले जातात पण ही उत्पादनं खूपच महाग असतात.

कोरियन महिलांची स्किन इतकी चमकदार कशी? त्यांच्या चेहऱ्यावरून त्याचं वय कसं दिसत नाही? असे प्रश्न बऱ्याच जणांना पडतात. (Korean Skin Care Tips) जगभरातील बरेच लोक आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात पण हवातसा फरक दिसत नाही. बाजारातही कोरीयन प्रोडक्ट्स सगळ्यात जास्त विकले जातात पण ही उत्पादनं खूपच महाग असतात. कोरियन महिला चेहऱ्याची काळजी कशी घेतात याबाबतचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. (How To Get Korean Glass Skin Naturally)

त्यातून एका सोप्या स्किन केअर रूटीनबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. उपाय करण्यासाठी तुम्हाला पैशांची गरज लागणार नाही. किचनमधले काही साहित्य लागेल. एका कंटेट क्रिएटरनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ५५ वर्षीय कोरियन सासूच्या स्किन केअरबद्दल सांगितले आहे. तिनं या व्हिडिओमध्ये सांगितले की क्लिओपेट्रासुद्धा हा उपाय करायची. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मध, लिंबाचा रस, जोजोबा रस हे साहित्य लागेल. 

हा उपाय करण्यासाठी एक वाटी घ्या. त्यात मध, लिंबाचा रस, जोजोबा रस मिसळा. हे कॉम्बिनेशल १० मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवू शकता. त्यानंतर स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा सकाळच्या वेळेस करू शकता. मध हा स्किन केअर रूटीनचा एक महत्वाचा भाग असतो. ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या मॉईश्चराईज आणि सॉफ्ट राहतो. यामुळे डाग कमी होण्यास मदत होते.

लिंबाचा रस

तुमची त्वचा सेंसिटिव्ह असेल तर लिंबाचा रस तुम्ही चेहऱ्यावर लावू नका. लिंबाचा रस टॅनिंग हटवून चेहऱ्याचा ग्लो वाढवतो आणि एक्स्ट्रा ऑईल नियंत्रणात ठेवता येते.

जोजोबा तेल

जोजोबा तेल कोरड्या त्वचेची समस्या कमी करते. यामुळे त्वचेला आतून पोषण मिळते. मॉईश्चर टिकून राहतं आणि कोरडी, रखरखीत त्वचा दिसत नाही. तुम्ही जोजोबा ऑईलचा अर्क असलेला फेस वॉशही वापरू शकता. यामुळे कोरियन उपायांनी चेहरा थकल्यासारखा न दिसता सुंदर दिसेल आणि चेहऱ्यावर तेजही येईल. चेहऱ्यावरचं टॅनिंग काही प्रमाणात कमी होण्यासही मदत होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी