Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेहरा काळवंडलाय? किचनमधले २ पदार्थ चेहऱ्याला रात्री लावा; सकाळी चेहऱ्यावर येईल तेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:20 IST

Homemade Face Pack For Skin : हा फेस पॅक घरच्याघरी तयार करणं खूपच सोपं आहे. आठवड्यातून २ ते  ३ वेळा हा फेस पॅक चेहऱ्याला लावल्यानं चेहऱ्याचं सौंदर्य खुलून येईल.

हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेवर कोरडेपणा येतो ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसते. अनेकदा  दिवसातून ३ ते ४ वेळा कोल्ड क्रिम लावावी लागते. चेहरा कोरडा दिसत असेल तर तुम्ही बाजारातून काही क्रिम्स विकत घेऊन चेहऱ्याला लावण्यापेक्षा घरीच हा फेसपॅक तयार करून लावू शकता. (How To Get Glowing Skin)

हा फेस पॅक घरच्याघरी तयार करणं खूपच सोपं आहे. आठवड्यातून २ ते  ३ वेळा हा फेस पॅक चेहऱ्याला लावल्यानं चेहऱ्याचं सौंदर्य खुलून येईल. हा नॅच्युरल फेस पॅक तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून तयार करू शकता. (How To Get Glowing Skin With Banana And Malai Face Pack)

 केळी आणि दुधाच्या सायीचा फेसपॅक

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्ही केळी आणि दुधाच्या सायीचा फेसपॅक लावू शकता. दुधाची साय त्वचेसाठी फायदेशीर ठरते. ज्या लोकांची त्वचा कोरडी असते त्यांनी चेहऱ्यावर नियमित  दुधाची साय लावायला हवी. ज्यामुळे त्वचा मॉईश्चराईज राहण्यास मदत होते. केळ्यात व्हिटामीन ए, व्हिटामीन बी, ई मोठ्या प्रमाणात असते. हे सर्व पदार्थ त्वचेला पोषक तत्व देतात. केळ्याचा फेस पॅक त्वचेला लावल्यानं सुरकुत्या येत नाहीत.

अर्धवट पिकलेलं केळी एका चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मॅश करून घ्या. नंतर यात मध आणि साय घाला हे सर्व पदार्थ जोपर्यंत क्रिमी दिसत नाहीत तोपर्यंत एकजीव करा.  ही क्रिम लावून १५ मिनिटं सुकू द्या. नंतर  कोमट पाण्यानं चेहरा धुवा.  त्यानंतर लाईट मॉईश्चरायजर लावा, आठवड्यातून २ वेळा हा पॅक तुम्ही चेहऱ्याला लावला तर चांगला परिणाम दिसून येईल. 

दुधाच्या सायीमध्ये फॅट्सचे प्रमाण भरपूर असते. कोरड्या त्वचेसाठी हे एखाद्या वरदानाप्रमाणे आहे. साय लावल्यामुळे त्वचेत ओलावा टिकून राहतो आणि त्वचा मऊ-मुलायम होते. सायीमध्ये लॅक्टिक एसिड असते. हे एसिड त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यास आणि त्वचेचा नैसर्गिक रंग सुधारण्यास मदत करते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.  आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग निघून जाईल आणि चेहरा चमकदार दिसण्यास मदत होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Get glowing skin overnight with banana and milk cream face pack.

Web Summary : Combat dry winter skin with a homemade banana and milk cream face pack. Rich in vitamins and fats, it moisturizes, reduces tanning, and adds a natural glow. Apply 2-3 times a week for best results.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी