लग्नाचा दिवस हा प्रत्येक मुलीसाठी खूपच खास दिवस असतो. याशिवाय आपण जगातील सर्वात सुंदर स्त्रीप्रमाणे दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यासाठी महागडी उत्पादनं वापरण्याऐवजी त्वचेची काळजी घेण्यासाठी काही योग्य स्किन केअर उत्पादनांची निवड केली तर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल. ऐनवेळी पार्लरला जाऊन महागडया ट्रिटमेंट्स घेतल्यानं काही होत नाही. तुम्ही जर रोजच्या रुटीनमध्ये स्वत:ची काळजी घेतली तर चेहरा उजळण्यास मदत होईल. (How To Get Bridal Glow At Home)
भरपूर पाणी पित राहा. ज्यामुळे स्किन आतून हायड्रेट राहण्यास मदत होते. रात्री झोपताना चेहरा स्वच्छ करून त्यात टोनर आणि मॉईश्चरायजर लावा. रोज सकाळी बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला विसरू नका. लग्नाच्या 2 ते 3 महिने आधी फेशियल ट्राय करा. आठवड्यातून 1 ते 2 वेळा स्क्रब करा. ज्यामुळे चेहऱ्याची चमक टिकून राहण्यास मदत होईल. (How To Get Bridal Glow Naturally)
सीटीएम रूटीन ठेवा
आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार क्लिजिंग, टोनिंग आणि मॉईस्चरायजिंग चा नियम ठेवा. दिवसातून 2 वेळा चेहरा स्वच्छ धुवा. ज्यामुळे धूळ, घाण रोमछिद्रांमध्ये जमा होणार नाही.
घरगुती फेस पॅक
केमिकलयुक्त ब्लीच चेहऱ्याला लावण्याऐवजी घरगुती फेस पॅक चेहऱ्याला लावा. बेसनात हळद आणि दुधाची साय मिसळून चेहऱ्याला लावल्यानं चेहऱ्यावर नैसर्गिक उजळपणा येण्यास मदत होईल. याशिवाय त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मध आणि लिंबू वापरा. मधात लिंबाचे काही थेंब मिसळून हे मिश्रण चेहऱ्याला लावा. २ ते ३ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. जर तुमची त्वचा डल वाटत असेल तर पपई मॅश करून चेहऱ्याला लावा. यामुळे एंजाईन्स डेड स्किन सेल्स हटवून चेहऱ्याला ग्लो येण्यास मदत होईल.
हायड्रेशन आणि आहार
दिवसभरातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या जेणेकरून शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होईल. त्वचेला नैसर्गिक चमक देण्यासाठी हे उत्तम ड्रिंक आहे. तेलकट, गोड पदार्थ कमी खा. यामुळे तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात.
