थंडीच्या दिवसांत हवेतल्या कोरडेपणामुळे त्वचेवर परिणाम होतो. त्वचा कोरडी, काळपट होऊ लागते. अनेकांना थंडीच्या दिवसांत टाचांना भेगा पडण्याची समस्या उद्भवते. टाचांना मऊ बनवण्यासाठी बाजारात बऱ्याच क्रिम्स उपलब्ध आहेत पण काही घरगुती क्रिम्सचा वापर करून तुम्ही टाच मऊ बनवू शता. गव्हाच्या पीठ आपल्या प्रत्येकाच्याच घरी असते. गव्हाच्या पिठाचा वापर करून तुम्ही टाचांना मऊ बनवू शकता. गव्हाच्या पिठाचा वापर कसा करवा समजून घेऊ. (How To Fix Cracked Heels Permanently Using Wheat Flour)
गव्हाचे पीठ आणि मधाचा हिल स्क्रब
गव्हाचे पीठ निसर्गत:एक्सफोलिएटर म्हणून काम करते. जे टाचांवरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला २ चमचे गव्हाचे पीठ, १ चमचा मध आणि थोडं कोमट पाणी हे साहित्य लागेल. या तिन्ही गोष्टी एकत्र करून एक जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाचांवर लावा आणि ५ ते १० मिनिटं हलक्या हातानं मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने पाय धुवा. मधामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो आणि पीठ टाचांना गुळगुळीत बनवते.
गव्हाचे पीठ आणि मधाचा हिल स्क्रब
गव्हाचे पीठ निसर्गत: एक्सफोलिएटर म्हणून काम करते. जे टाचांवरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. या तिन्ही गोष्टी एकत्र करून एक जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाचांवर लावा आणि ५ ते १० मिनिटं हलक्या हातानं मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्यानं पाय धुवा. मधामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो आणि पीठ टाचांना गुळगुळीत करते.
गव्हाचे पीठ, हळद आणि मोहोरीचे तेल
हे सर्व पदार्थ मिसळून एक घट्ट लेप तयार करा. रात्री झोपण्यापूर्वी हा लेप स्वच्छ धुतलेल्या टाचांवर लावा. त्यावर सुती सॉक्स घालून झोपा. हळदीमधील दाहशामक गुणधर्म जखमा भरून काढतात. तर मोहोरीचे तेल टाचांना खोलवर मऊ बनवते.
लिंबाच्या रोपाला वाढ खूप-पण लिंबूच येत नाहीत? कुंडीत 'हा' पदार्थ घाला, रसाळ लिंबूंनी लगडेल झाड
गव्हाचे पीठ आणि कच्च्या दुधाचा पॅक
जर तुमची त्वचा खूपच संवेदनशील असेल तर दुधाचा वापर करणं उत्तम ठरतं. गव्हाचे पीठ आणि कच्च दूध मिसळून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाचांना लावून २० मिनिटं तसंच ठेवा. वाळल्यानंतर कोमट पाण्यानं पाय धुवा. यामुळे टाचांचा काळेपणा दूर होतो.
