lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > ऑफिसला जाण्यासाठी झटपट हेअरस्टाईल करायची? पोनीटेल घालण्याच्या २ खास पद्धती, दिसाल स्टायलिश

ऑफिसला जाण्यासाठी झटपट हेअरस्टाईल करायची? पोनीटेल घालण्याच्या २ खास पद्धती, दिसाल स्टायलिश

Hair Style Tips: ऑफिसला जाण्यासाठी केसांची झटपट एखादी स्टाईल करायची असेल तर या दोन पद्धतींनी पोनीटेल घालून बघा.. (attractive ponytail for the office)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2022 04:00 PM2022-12-24T16:00:16+5:302022-12-24T16:00:56+5:30

Hair Style Tips: ऑफिसला जाण्यासाठी केसांची झटपट एखादी स्टाईल करायची असेल तर या दोन पद्धतींनी पोनीटेल घालून बघा.. (attractive ponytail for the office)

How to do attractive ponytail for the office? How to do voluminous high ponytail | ऑफिसला जाण्यासाठी झटपट हेअरस्टाईल करायची? पोनीटेल घालण्याच्या २ खास पद्धती, दिसाल स्टायलिश

ऑफिसला जाण्यासाठी झटपट हेअरस्टाईल करायची? पोनीटेल घालण्याच्या २ खास पद्धती, दिसाल स्टायलिश

Highlightsऑफिससाठी पोनीटेलच घालायचा असेल तर या दोन सोप्या पण खूपच स्टायलिश लूक देणाऱ्या हेअरस्टाईल नक्की ट्राय करून बघा

ऑफिसमध्ये आपण नक्कीच स्मार्ट, प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे. पण बऱ्याचदा असं होतं की सकाळच्या वेळी एवढी धावपळ, गडबड असते की छान तयार व्हायला वेळच मिळत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला की अनेक जणी एक पोनीटेल घालतात किंवा क्लचर लावतात आणि झटपट तयार होतात. म्हणूनच जर तुम्हाला ऑफिससाठी पोनीटेलच (How to do stylish hairstyle very quickly?) घालायचा असेल तर या दोन सोप्या पण खूपच स्टायलिश लूक देणाऱ्या हेअरस्टाईल नक्की ट्राय करून बघा (attractive ponytail for the office). अवघ्या एक- दोन मिनिटांत तुम्ही छानशी हेअरस्टाईल करून ऑफिससाठी मस्त तयार होऊ शकता.

स्टायलिश पोनीटेल कसा घालायचा?
१. पहिली हेअरस्टाईल

यासाठी समाेरच्या बाजुचे काही केस घेऊन त्याचा एक उंच पोनी घाला. त्यानंतर मागच्या बाजुचे जे केस आहेत, त्याचे मधोमध भांग पाडून दोन सारखे भाग करा.

लायटरने गॅस शेगडी पेटत नाहीये? लगेच फेकून देऊ नका, त्याआधी करून बघा २ सोपे उपाय 

आता वरच्या पाेनीचे रबर जिथे लावले आहे, त्याच्या आजुबाजूने हे दोन्ही भाग वर घ्या आणि त्याला एक रबर लावा. रबर लावताना आधीचा पोनीही त्यात घ्या. ज्यांचे केस पातळ आहेत, त्यांच्यासाठी ही हेअरस्टाईल उत्तम आहे. कारण यामुळे केस दाट दिसतात. शिवाय पोनीही दोन लेयरमध्ये येतो.

 

२. दुसरी हेअरस्टाईल
यासाठी समोरून डाव्या आणि उजव्या बाजूचे केस तसेच राहू द्या आणि मधल्या, मागच्या केसांचा एक पोनी घाला. आता जिथे रबर बांधले आहे, तिथे मधोमध एक कंगवा अडकवा. आता डाव्या बाजुच्या केसांचे ३ ते ४ भाग करा.

ख्रिसमस पार्टीसाठी सॅलेड डोकोरेशन करण्याच्या एक से एक आयडिया, पाहूनच सगळे होतील खुश..

पहिला म्हणजेच सगळ्यात वरचा भाग कंगव्याच्या मागच्या बाजुने अडकवून उजव्या बाजूने बाहेर करा. तसेच डाव्या बाजुचा पहिला भाग घेऊन करा. यानंतर एकदा उजव्या तर एकदा डाव्या बाजूने करा. सगळ्या बटांचे असे करून झाले की आधीच्या पोनीच्या खाली एक रबरबँड लावून त्या सगळ्या बटा एकत्रित रबर लावून पॅक करा. 

 

Web Title: How to do attractive ponytail for the office? How to do voluminous high ponytail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.