Lokmat Sakhi >Beauty > पांढरे केस चमकतात-डायची सवयही नको? सदाफुलीचा १ जादूई उपाय, काळेभोर-दाट होतील केस

पांढरे केस चमकतात-डायची सवयही नको? सदाफुलीचा १ जादूई उपाय, काळेभोर-दाट होतील केस

How To Color My White Hairs : केस नैसर्गिकरित्या काळे करण्याचे उपाय पाहूया. आपल्यापैकी अनेक महिला आणि पुरूष पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकल्सयुक्त डायचा  वापर करतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 18:51 IST2025-01-19T18:46:43+5:302025-01-19T18:51:01+5:30

How To Color My White Hairs : केस नैसर्गिकरित्या काळे करण्याचे उपाय पाहूया. आपल्यापैकी अनेक महिला आणि पुरूष पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकल्सयुक्त डायचा  वापर करतात.

How To Color My White Hairs Black With Poonam Devnani Home Remedy | पांढरे केस चमकतात-डायची सवयही नको? सदाफुलीचा १ जादूई उपाय, काळेभोर-दाट होतील केस

पांढरे केस चमकतात-डायची सवयही नको? सदाफुलीचा १ जादूई उपाय, काळेभोर-दाट होतील केस

केस पांढरे होणं (Hair Care Tips) सध्या खूपच कॉमन झालं आहे. या समस्येपासून सुटका  मिळवण्यासाठी लोक  वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आपल्या केसांवर घासतात. याचा परीणाम पाहायचा झाला तर केस इंस्टंट काळे होतात पण आठवड्याभरातच त्यांचा रंग डल होऊ लागतो आणि स्काल्पवर एलर्जी होण्याची  शक्यता वाढते. कंटेट क्रिएटर पूनम देवनानी यांनी काही घरगुती उपाय सांगितेल आहेत. हे उपाय केल्यानं केस काळे होण्यास मदत होईल. (How To Color My White Hairs Black With Poonam Devnani Home Remedy)

केस नैसर्गिकरित्या काळे करण्याचे उपाय पाहूया. आपल्यापैकी अनेक महिला आणि पुरूष पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकल्सयुक्त डायचा  वापर करतात. ज्याच्या वापरानं डोळ्यांवरही सूज येते तर काहींना स्काल्पवर खाज येते. पूनमन देवनानी यांनी व्हाईट हेअर रेमिडी सांगितले आहे.

सदाफुलीची  - २ वाटी

सदाफुलीची पानं- २ वाटी

चहा पावडर - १ चमचा

पाणी - १ ग्लास

कॉफी पावडर - १ पाकीट

सगळ्यात आधी एक भांडं घ्या. त्यात १ ग्लास पाणी आणि १ चमचा  चहा पावडर  घालून उकळवून घ्या. पाणी पूर्ण काळे झाल्यावर थंड करा. यानंतर मिक्सरमध्ये फुलं आणि पांन घाला. याच पाण्यात चहा पावडर घाला. मिक्सरमध्ये सर्वकाही मिसळून पेस्ट तयार झाल्यावर एका भांड्यात गाळून घ्या. नंतर १ रूपये किमतीचे कॉफीचे पाकीट बाऊलमध्ये घालून चांगले मिक्स करा. डाय व्यवस्थित गडद करण्यासाठी लोखंडी कढईत २-३ तास ​​ठेवा. 


तुम्हाला दिसेल की मेहंदीचा रंग काळा झाला आहे. ते केसांना लावा आणि एक ते दीड तासांनी केस धुवा. तुमचे केस नैसर्गिकरित्या कसे काळे झालेले दिसून येतील. निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या सौंदर्य उत्पादनं म्हणून काम करतात. या फुलांचा वापर केसांसाठी फायदेशीर ठरतो. नेहमी हा उपाय केल्यास केस पांढरे होण्याची समस्या उद्भवत नाही. याशिवाय केसही निरोगी राहतात.

Web Title: How To Color My White Hairs Black With Poonam Devnani Home Remedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.