Join us

मुलांच्या पायाच्या बोटांवर साचलेला मळ काढून टाकण्यासाठी २ उपाय- काळवंडलेले पाय होतील स्वच्छ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2025 09:25 IST

How To Clean Toes Of Kids?: लहान मुलांचे पाय, पायाची बोटे आणि दोन बोटांमधली जागा खूप काळी होऊन जाते. ते स्वच्छ करण्यासाठी हे उपाय करून पाहू शकता.(simple tips to clean tanning and dead skin and blackness on toes of kids)

ठळक मुद्दे१५ दिवसांतून एकदा तरी मुलांचे पाय पुढे सांगितलेल्या पद्धतीने स्वच्छ करा.

बऱ्याच लहान मुलांच्या बाबतीत असं दिसून येतं की त्यांचे पाय, पायाची बोटे आणि दोन बोटांमध्ये असणारी जागा अतिशय काळवंडलेली असते. त्यामध्ये मळ साचलेला असतो. कारण लहान मुलांना त्यांच्या पायाच्या स्वच्छतेची व्यवस्थित काळजी घेता येत नाही. खेळून आल्यानंतर बऱ्याचदा ते पाय धूत नाहीत. पाय धुतले तरी व्यवस्थित घासत नाही. त्यामुळे पाय काळपट होत जातात. त्यांच्यावर मळ साचत जातो (How To Clean Toes Of Kids?). शिवाय अंघोळीच्या वेळीही ते पायाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच १५ दिवसांतून एकदा तरी मुलांचे पाय पुढे सांगितलेल्या पद्धतीने स्वच्छ करा.(simple tips to clean tanning and dead skin and blackness on toes of kids)

लहान मुलांचे तळपाय, पायाची बोटं कशी स्वच्छ करावी?

 

१. बेसन, दही, हळद 

लहान मुलांचे पाय आणि पायाची बोटे स्वच्छ करण्यासाठी हा उपाय अगदी सोपा आहे. जुना पारंपरिक आहे. यामुळे मुलांच्या पायाच्या त्वचेला कोणतंही नुकसान होणार नाही.

पदार्थांचा मनसोक्त सुगंध घ्या आणि भराभर वजन कमी करा? शास्त्रज्ञांनी शोधली वेटलॉसची आगळीच पद्धत..

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये बेसन घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद आणि कच्चे दूध घाला. हा लेप आता मुलांच्या पायाला लावा आणि ५ मिनिटांनंतर हळुवार हाताने घासून काढून टाका. यानंतर स्वच्छ पाण्याने पाय धुवून घ्या. पाय स्वच्छ होतील. 

 

२. पिठीसाखर आणि कॉफी पावडर 

हा उपायही मुलांचे तळपाय स्वच्छ करण्यासाठी अतिशय चांगला आहे. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडीशी पिठीसाखर घ्या. त्यात थोडा मध आणि एक टीस्पून कॉफी पावडर घाला.

लाकडी चॉपिंग बोर्ड पिवळट- काळा पडला? २ पद्धतींनी करा स्वच्छ, नव्यासारखा चकाचक होईल

यानंतर त्यामध्ये लिंबाचे ५ ते ६ थेंब घाला. आता हा लेप मुलांच्या पायाला लावा आणि त्यांची पायाची त्वचा व्यवस्थित घासून काढा. यामुळे मुलांच्या पायावरची डेड स्किन, टॅनिंग निघून जाईल आणि पाय अगदी स्वच्छ होतील.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीलहान मुलं