Neck Blackness Home Remedy : मानेवर काळपटपणा येण्याची समस्या केवळ महिला किंवा पुरूष कुणालाही होऊ शकते. सामान्य जर मान काळी झाली असेल तर घरातील लोक घासण्याचा सल्ला दिला जातो. काही लोक जोरजोरात मान घासतात, अशात मळ निघून जातो. पण इतक्या जोरात मान घासल्यावर त्वचा खरचटण्याची किंवा लाल चट्टे येण्याची भितीही असते.
अनेक महिला तर मानेचा काळपटपणा दूर करण्यासाठी अनेक महागड्या प्रॉडक्ट्सचा देखील वापर करतात. पण तरी सुद्धा हवा तसा काही फरक बघायला मिळत नाही. जर आपल्याला सुद्धा ही समस्या असेल तर आपण यावर एक खास आणि प्रभावी उपाय बघणार आहोत.
त्वचा आणि आरोग्यासंबंधी समस्यांवर आयुर्वेदात काहीना काही उपाय असतोच असतो. या उपायांकडे आपण घरगुती उपाय म्हणूनही बघू शकता. या उपायांची खासियत म्हणजे यांचे काही साइड इफेक्ट्स नसतात आणि ते हळू पण प्रभावी काम करतात.
काय आहे उपाय?
मानेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी योग गुरू कैलाश बिश्नोई यांनी याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, हा उपाय केल्यावर केवळ ५ ते ७ मिनिटांत काळी मान पूर्णपणे साफ होईल. चला तर पाहुयात काय आहे हा उपाय.
काय लागेल साहित्य
अर्धा लिंबू
हळद
कॉफी पावडर
खोबऱ्याचं तेल
शाम्पू
या सगळ्या गोष्टी लिंबावर मावतील इतक्याच घ्यायच्या आहेत.
हा उपाय करण्यासाठी फार काही मेहनत करावी लागणार नाहीये. फक्त कापलेल्या लिंबावर हळद, कॉफी पावडर, खोबऱ्याचं तेलं आणि शाम्पू टाकायचं आहे. त्यानंतर लिंबू मानेवर घासायचं आहे. १० मिनिटं लिंबानं मान घासायची आहे. काही दिवस हा उपाय केल्यास फरक दिसून येऊ शकतो.
लिंबू, कॉफी पावडर, खोबऱ्याचं तेल आणि शाम्पू या गोष्टींचं कॉम्बिनेशन त्वचा साफ करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. यानं मानेवर जमा झालेला मळ, टॅनिंग, डेड स्किन दूर होते. लिंबू आणि हळदीनं त्वचा नॅचरल पद्धतीन साफ होते, तर कॉफी पावडरनं त्वचा एक्सफोलिएट होते. तसेच खोबऱ्याच्या तेलानं त्वचा हायड्रेट राहते.