Lokmat Sakhi >Beauty > खर्च फक्त ५० रुपये आणि उपाय ४, महागड्या फेशियलपेक्षा भारी ग्लो येईल चेहऱ्यावर

खर्च फक्त ५० रुपये आणि उपाय ४, महागड्या फेशियलपेक्षा भारी ग्लो येईल चेहऱ्यावर

Natural glow without hydra facial: Home remedies for glowing skin: Homemade face scrub for oily and dry skin: Natural facial at home for clear skin: हायड्रा फेशियल केल्यामुळे त्वचा सुंदर आणि ग्लोइंग होते असं म्हटलं जाते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2025 18:35 IST2025-04-18T18:30:17+5:302025-04-18T18:35:02+5:30

Natural glow without hydra facial: Home remedies for glowing skin: Homemade face scrub for oily and dry skin: Natural facial at home for clear skin: हायड्रा फेशियल केल्यामुळे त्वचा सुंदर आणि ग्लोइंग होते असं म्हटलं जाते.

how to avoid hydra facial to skin natural glow with home remedies pimples face pack cleansing and face scrub dry and oily skin solution | खर्च फक्त ५० रुपये आणि उपाय ४, महागड्या फेशियलपेक्षा भारी ग्लो येईल चेहऱ्यावर

खर्च फक्त ५० रुपये आणि उपाय ४, महागड्या फेशियलपेक्षा भारी ग्लो येईल चेहऱ्यावर

प्रत्येक महिन्याला महिला पार्लरमध्ये जातात. अगदी थ्रेडिंग-वॅक्सिंगसह अनेक गोष्टीसाठी पैसे खर्च करतात. (Natural glow without hydra facial) चेहरा सुंदर दिसावा यासाठी महागड्या उत्पादनासोबत फेशियल देखील करतात. त्वचेसाठी अनेक नवीन प्रकारचे फेशियल आपल्याला पाहायला मिळते.(Home remedies for glowing skin) बोटॉक्सनंतर हायड्रा फेशियलची क्रेझ महिलांमध्ये पाहायला मिळत आहे. (Homemade face scrub for oily and dry skin)
हायड्रा फेशियल केल्यामुळे त्वचा सुंदर आणि ग्लोइंग होते असं म्हटलं जाते. (How to get glowing skin naturally without hydra facial) परंतु, हे फेशियल करण्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणात पैसे देखील खर्च करावे लागतात. (Simple home remedies for soft and glowing skin) अनेकदा हे फेशियल केल्यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होतो. पिंपल्स- मुरुमांची समस्या वाढते. त्वचा कोरडी पडणे, टॅनिंग आणि पिग्मेंटेशनच्या समस्येला देखील सामोरे जावे लागते. (Best natural face pack for pimples and brightness)

२ रुपयांच्या कॉफीने हातांचे कोपरे- गुडघ्यांचा काळपटपणा होतो दूर, पाहा १० मिनिटांचा सोपा उपाय

त्वचेला अधिक ग्लो येण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. रोहित सचदेवा यांचा त्यांनी काही सोपे घरगुती उपाय सांगितले आहे. ज्यामुळे आपली त्वचा कमी खर्चात जास्त चमकेल. त्यासाठी हे ४ सोपे उपाय लक्षात ठेवा. 

1. फेस क्लिन्सर वापरा 

सगळ्यात आधी आपल्याला फेस क्लिन्सर वापरायला हवे. ज्याच्या मदतीने आपल्या त्वचेवरील सगळी घाण निघून जाण्यास मदत होईल. यासाठी एक चमचा मध, दूध आणि ग्लिसरीन मिसळवून चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील घाण आणि अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होईल. 

2. चेहरा चमकवण्यासाठी 

हायड्रा फेस पॉलिशमुळे आपल्या त्वचेला चमक येते. परंतु, घरच्या घरी त्वचा चमकवायचा असेल तर यासाठी आपल्याला टोमॅटोच्या क्रशमध्ये चमचाभर मध आणि कॉफी पावडर मिसळून लावायला हवे. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा धुवा. यामुळे चेहरा उजळण्यास मदत होईल. 

">


  
3. फेस स्क्रब 

महागड्या स्क्रबिंगपेक्षा काही घरगुती उपाय केले तर चेहरा चमकण्यास मदत होईल. यासाठी आपण चमचाभर साखर आणि नारळाचे तेल मिक्स करुन चेहऱ्यावर लावावे. यानंतर चेहरा थोडा ओला करुन स्क्रबिंग करा. व्यवस्थित मसाज केल्यानंतर चेहरा धुवा. ज्यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स निघून जाण्यास मदत होईल. 

4. फेस पॅक 

फेस पॅक आपल्या त्वचेला नैसर्गिक चमक देतो. यासाठी आपल्याला एक पिकलेले केळी मॅश करुन त्यात दूध आणि मध मिसळावे लागेल. हा पॅक आपल्या चेहऱ्यावर २० मिनिटे ठेवा आणि नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. असे केल्याने चेहऱ्यावर फेशियलसारखा ग्लो येण्यास मदत होईल. 

 

Web Title: how to avoid hydra facial to skin natural glow with home remedies pimples face pack cleansing and face scrub dry and oily skin solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.