दूध (Milk) हा आहाराचा महत्वपूर्ण भाग आहे. तब्येतीला दुधाच्या सेवनानं बरेच फायदे मिळतात. दुधामुळे चेहरा एक्सफोलिएट होण्यासही मदत होते. चेहऱ्यावर तेज येण्यासाठी कच्चं दूध फायदेशीर ठरतं. कच्चं दूध त्वचेवर लावल्यानं बरेच फायदे मिळतात. सकाळी काही वेळासाठी कच्चं दूध तुम्ही चेहऱ्यावर लावल्यास चेहर्यावर वेगळीच चमक येईल. कच्चं दूध तुम्ही कोणकोणत्या पद्धतीनं लावू शकता ते समजून घेऊ.(Apply Row Milk On Face To Get Glowing Skin)
चेहऱ्यावर कच्चं दूध कसं लावावं
चेहऱ्यावर कच्चं दूध जसच्या तसं लावणं जास्त फायदेशीर ठरतं. सकाळी चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. नंतर एका वाटीत कच्च दूध काढून त्यात कापसाचा बोळा बुडवून त्वचेवर घासून घ्या. ३ ते ४ मिनिटं दूध चेहऱ्यावर लावून ठेवल्यानं त्वचेवरील मळ निघून जाईल आणि डेड स्किन निघून जाण्यासही मदत होईल.त्वचेवर ग्लो येईल. तसंच तुम्ही गुलाबपाणी मिसळूनही चेहरा साफ करू शकता.
दूध आणि केसर
कच्च्या दुधात केसर मिसळून हे दूध प्यायलं जातं. केसर आणि दूधाचा वापर करून तुम्ही वेगवेगळे पक्वान्न बनवू शकता. पण यासाठी दुधात केसर घालून चेहर्यावर लावून घ्या. चेहऱ्यावर लावून १० ते १५ मिनिटं तसंच ठेवल्यानंतर चेहरा धुवून घ्या. हा उपाय केल्यानं चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होते.
थंडीत तोंडी लावण्यासाठी करा खमंग शेंगदाण्याची चटणी; भाकरी असो की चपाती, जेवणाची वाढेल चव
दूध आणि मध
कच्च दूध आणि मधाचं मिश्रण त्वचेसाठी तसंच केसांसाठी आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. ज्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. तुम्ही कच्च्या दुधात मध मिसळून लावू चेहऱ्याला शकता. यामुळे चेहरा निस्तेज दिसणार नाही.
थंडीत दही खावं की टाळावं? ९९ टक्के लोकांना माहीत नसतं दही कसं खावं, हाडं कमकुवत होण्याचा धोका
दूध आणि हळद
चेहऱ्याचं टॅनिंग काढून टाकण्यासाठी तुम्ही खास उपाय करू शकता. एक वाटी दुधात थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. ज्यामुळे त्वचेवरील डाग हलके होतील, यात तुम्ही बेसनाचं पीठ मिसळूनही फेस पॅक लावू शकता.