Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > टॅनिंग दूर करण्यासाठी बटाट्याचा रस कसा वापरावा? महागड्या क्रीमपेक्षा बेस्ट ठरेल हा घरगुती उपाय

टॅनिंग दूर करण्यासाठी बटाट्याचा रस कसा वापरावा? महागड्या क्रीमपेक्षा बेस्ट ठरेल हा घरगुती उपाय

How to Remove Tanning : महागडे क्रीम वापरण्यापेक्षा बटाट्याचा रस हा टॅनिंग दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर मानला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 11:50 IST2026-04-02T11:18:19+5:302026-04-02T11:50:26+5:30

How to Remove Tanning : महागडे क्रीम वापरण्यापेक्षा बटाट्याचा रस हा टॅनिंग दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर मानला जातो.

How to apply potato juice to face to remove tanning | टॅनिंग दूर करण्यासाठी बटाट्याचा रस कसा वापरावा? महागड्या क्रीमपेक्षा बेस्ट ठरेल हा घरगुती उपाय

टॅनिंग दूर करण्यासाठी बटाट्याचा रस कसा वापरावा? महागड्या क्रीमपेक्षा बेस्ट ठरेल हा घरगुती उपाय

How to Remove Tanning : उन्हाळ्यात प्रखर सूर्यकिरणांमुळे त्वचा टॅन होणं फारच स्वाभाविक आहे. घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेतली नाही की, टॅनिंग होतेच होते. आता चार महिने उन्हाळा राहणार म्हणजे दरवेळी टॅनिंग दूर करण्यासाठी पार्लरला जाणं तर कुणालाही परवडणारं नाही किंवा सतत महागडे क्रीम विकत आणणंही सोपं नाही. अशात जास्त खर्च न करताही आपण टॅनिंगची समस्या लगेच दूर करू शकता. यासाठीचा सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे बटाटे. महागडे क्रीम वापरण्यापेक्षा बटाट्याचा रस हा टॅनिंग दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर मानला जातो. अशात टॅनिंग दूर करण्यासाठी बटाट्याचा रस कसा लावावा हे समजून घेऊया.

कसं तयार कराल मिश्रण?

टॅनिंग दूर करण्यासाठी २ ते ३ चमचे बटाट्याचा रस लागेल आणि एक चमचा दही लागेल. एका वाटीमध्ये बटाट्याचा रस आणि दही चांगली मिक्स करून घ्या. त्यानंतर याची एक मुलायम अशी पेस्ट तयार होऊ द्या.

कसं लावाल? 

बटाट्याचा रस आणि दह्याचं हे मिश्रण फेस पॅकसारखं चेहरा आणि मानेवर चांगल्या पद्धतीने लावा. चांगला परिणाम मिळण्यासाठी साधारण १५ ते २० मिनिटे हे मिश्रण चेहऱ्यावर तसंच राहू द्या. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. 

बटाट्याचा रस आणि दह्याच्या मिश्रणात नॅचरल ब्लीचिंग गुण असतात. टॅनिंग दूर करण्यासाठी हे मिश्रण आपण आठवड्यातून १ ते २ वेळा चेहऱ्यावर लावू शकता. सुरकुत्या आणि फाइन लाईन्स कमी करण्यासाठी देखील या उपायाचा आपल्या रूटीनमध्ये समावेश करू शकता. 

हा उपाय करताना एक काळजी घ्या की, हा फेस पॅक लावल्यानंतर आपल्याला उन्हात जायचं नाहीये. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे बटाट्याचा रस आणि दह्याचं हे मिश्रण चेहऱ्यावर लावण्याआधी पॅच टेस्ट करायला विसरू नका. 

Web Title : टैनिंग हटाने के लिए आलू का रस: एक प्राकृतिक, प्रभावी उपाय।

Web Summary : आलू के रस और दही से गर्मी की टैनिंग से स्वाभाविक रूप से लड़ें। मिलाएं, 20 मिनट के लिए लगाएं और धो लें। सर्वोत्तम परिणामों और झुर्रियों को कम करने के लिए साप्ताहिक रूप से दोहराएं। उपयोग करने से पहले पैच परीक्षण करें।

Web Title : Potato juice for tan removal: A natural, effective remedy.

Web Summary : Combat summer tan naturally with potato juice and yogurt. Mix, apply for 20 minutes, and rinse. Repeat weekly for best results and to reduce wrinkles. Patch test before use.