How To Apply Besan On Face : ब्यूटी प्रॉडक्टबाबत कितीही गवगवा गेला जात असला तरी चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी आजही अनेक महिला अनेक वर्षांपासून केले जाणारे घरगुती उपायच करतात. या उपायांवर त्यांचा विश्वास असतो. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे याचे काही साइड इफेक्ट्सही होत नाहीत. त्याहून मोठा फायदा म्हणजे यासाठी जास्त पैसेही लागत नाहीत. असाच एक फेमस उपाय म्हणजे बेसन.
बेसनाचा वापर खूप आधीपासून त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी केला जात आहे. पण जर याचा योग्य वापर केला गेला तरच याचा फायदा मिळतो. चुकीची पद्धत वापराल तर चेहऱ्यावरील डाग, काळपटपणा, पिंपल्स आणि सुरकुत्या जाणर नाहीत. बेसन लावण्याचे चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात. आधी ते पाहुयात मग, वापरण्याची योग्य पद्धत पाहुयात.
चेहऱ्यावर बेसन लावण्याचे फायदे
बेसन लावल्यानं चेहऱ्यावरील जास्तीचा तेलकटपणा कमी होतो. याच तेलामुळे पिंपल्स येतात. अशात बेसनानं चेहऱ्याला अॅंटी-एजिंग गुण मिळतात. तसेच त्वचेवर ग्लो सुद्धा येतो. बेसनामध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, प्रोटीन, व्हिटामिन्स या गोष्टी असतात. या तत्वांनी चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन सेल्सही निघून जातात. ज्यामुळे चेहरा साफ आणि क्लीन दिसतो.
कसं लावाल बेसन?
बेसन आणि हळद
हळदीमध्ये आयुर्वेदिक गुण असतात. अशात जेव्हा बेसन आणि हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावाल तर याचे त्वचेला दुप्पट फायदे मिळतात. सोबतच त्वचेवरील काळपटपणाही दूर होतो. हे तयार करण्यासाठी बेसनात दही आणि हळद मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर 15 मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्यानं धुवा. फरक दिसून येईल.
बेसन आणि गुलाबजल
चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर बेसनात गुलाबजल मिक्स करून लावायला हवं. यासाठी पेस्ट तयार होईल इतकं गुलाबजल बेसनात मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. यानं चेहऱ्यावरील जास्तीचं ऑइल निघून जाईल आणि सोबतच डागही दूर होतील. तसेच चेहऱ्यावरील ग्लो सुद्धा वाढेल.