Cracked Heels Remedy: भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा लोक आवडीने खातात. थंडीच्या दिवसात तर गरमागरम शेंगा खूपच टेस्टी वागतात. पण जास्तीत जास्त लोक भुईमुगाच्या शेंगांमधील दाणे खाऊन झाल्यावर टरफलं फेकतात. अनेकांना हे माहीत नसतं की, भुईमुगाच्या शेंगांची टरफलं आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे, ज्या समस्येसाठी महागडी क्रीम्सही कधी-कधी उपयोगी पडत नाहीत, ती समस्या ही साल दूर करू शकते.
हिवाळ्यात जास्त चालणे-फिरणे यामुळे होणाऱ्या फाटलेल्या टाचांची समस्या भरपूर लोकांना होते. खासकरून महिलांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. बाजारात मिळणाऱ्या क्रीम्स आणि ट्रीटमेंट्स अनेकदा महाग असतात आणि सगळ्यांवरच परिणाम करतीलच असेही नाही. अशा वेळी जर तुम्ही सोपे, स्वस्त आणि घरगुती उपाय शोधत असाल, तर भुईमुगाच्या शेंगांची साल किंवा टरफलं आपल्या खूप कामी येऊ शकतात. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचा मऊ करण्यास आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतात. योग्य पद्धतीने वापर केल्यास हा उपाय टाचांचा कोरडेपणा आणि भेगा कमी करण्यास उपयोगी ठरू शकतात.
शेंगांच्या टरफलांमधील पोषक तत्व
भुईमुगाच्या शेंगांच्या टरफलांमध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म असतात, जे फाटलेल्या टाचांची समस्या कमी करण्यास मदत करतात. या सालींमध्ये सौम्य एक्सफोलिएटिंग घटक असतात, जे टाचांवर साचलेली मृत त्वचा हळूहळू काढून टाकतात आणि नवीन त्वचेला श्वास घेण्याची संधी देतात.
कसा करावा वापर?
हा घरगुती उपाय करण्यासाठी आधी टरफलं नीट स्वच्छ करून घ्या, जेणेकरून त्यामध्ये माती किंवा ओलावा राहणार नाही. त्यानंतर या साली मिक्सरमध्ये टाकून बारीक पूड करून घ्या. त्यानंतर या पावडरमध्ये खोबऱ्याचं तेल, मोहरीचं तेल किंवा ऑलिव्ह तेल मिसळा. इच्छित असल्यास थोडे अॅलोवेरा जेलही घालू शकता, त्यामुळे मॉइश्चरायझिंगचा परिणाम अधिक चांगला होतो.
वापरण्याची पद्धत
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात पाय १०–१५ मिनिटे भिजवा. यामुळे त्वचा मऊ होते आणि उपायाचा परिणाम चांगला मिळतो. पाय पुसून तयार केलेले मिश्रण फाटलेल्या टाचांवर ५–१० मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. मसाज झाल्यानंतर कॉटनचे सॉक्स घालून रात्रभर तसेच ठेवा.
किती वेळा करावा उपाय?
हा उपाय आठवड्यातून ३ ते ४ वेळा नियमितपणे केल्यास टाचांचा कोरडेपणा हळूहळू कमी होतो, भेगा भरू लागतात आणि त्वचा मऊ व गुळगुळीत वाटू लागते.
