How Often Should I Use a Face Wash In Marathi : उन्हाळ्यात दिवसभर घामाच्या धारा लागणं आलंच. इतकंच नाही तर या दिवसांमध्ये त्वचेवर अधिक तेलही येतं. त्यामुळे बरेच लोक अनेकदा चेहरा धुतात. घाम, धूळ, माती, तेल दूर करण्यासाठी चेहरा धुणं गरजेचं आहेच. पण जास्त वेळा चेहरा धुतल्याने त्वचेचं नुकसान देखील होऊ शकतं. अशात चेहरा दिवसातून किती वेळा धुवावा किंवा धुवू नये हे माहीत असलं पाहिजे. तेच जाणून घेऊया.
चेहरा जास्त धुतल्याने काय होतं?
स्किन एक्सपर्ट सांगतात की, पुन्हा पुन्हा चेहरा धुवत असाल तर त्वचेतील नॅचरल ऑइल कमी होऊ लागतं, ज्यामुळे स्किनची पीएच लेव्हल बिघडते. म्हणजे जर आपण दिवसातून दोन किंवा तीनपेक्षा वेळा चेहरा धुवत असाल तर त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.
एक्सपर्टनुसार, जास्त फेस वॉशमुळे स्किन ड्राय होऊ लागते. चेहरा कोरडा, ताणलेला आणि संवेदनशील जाणवू शकतो. अनेकदा तर त्वचा कमी झालेला ओलावा पुन्हा मिळवण्यासाठी अधिक जास्त तेल बनवू लागते. अर्थात यामुळे त्वचा अधिक तेलकट दिसू लागतो आणि पिंपल्सची येऊ लागतात.
उन्हाळ्यात फार जास्त चेहरा धुतल्याने त्वचेचं आरोग्य बिघडतं. याचा अर्थ असा की, त्वचा बाहेरची धूळ, प्रदूषण आणि बॅक्टेरियापासून स्वत:चा बचाव करू शकत नाही. ज्यामुळे जळजळ, लाल चट्टे, खाज आणि पुरळ अशा समस्या होतात. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांना या गोष्टींचा त्रास अधिक होऊ शकतो.
किती वेळा धुवावा चेहरा?
एक्सपर्ट सल्ला देतात की, दिवसातून दोन किंवा तीन वेळा चेहरा धुणं पुरेसं आहे. एकदा सकाळी आणि एक रात्री झोपण्याच्या काही तासआधी चेहरा धुवावा. जर जास्त घाम येत असेल किंवा बाहेर धूळ-मातीत रहावं लागत असेल तर चेहरा साध्या पाण्याने धुणं चांगलं. प्रत्येकवेळी फेस वॉश वापरणं योग्य नाही.
काय काळजी घ्यावी?
फेस वॉशने चेहरा धुणं चांगलं असलं तरी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार त्याची निवड करावी. माइल्ड फेस वॉश चांगलं. फार जास्त केमिकल्स असलेला आणि हार्ड फेस वॉशने त्वचा आणखी जास्त ड्राय होण्याची धोका असतो. तसेच या दिवसांमध्ये घरातून बाहेर पडताना चेहरा रूमाले किंवा स्कार्फने झाकून ठेवावा.
Web Summary : Washing your face excessively in summer can harm skin by disrupting its natural oil balance, leading to dryness, irritation, and increased oil production. Experts recommend washing two to three times daily, using a mild cleanser and protecting skin from the sun.
Web Summary : गर्मी में बार-बार चेहरा धोने से त्वचा का प्राकृतिक तेल कम हो सकता है, जिससे रूखापन और जलन हो सकती है। विशेषज्ञ दिन में दो-तीन बार धोने, सौम्य क्लींजर का उपयोग करने और धूप से बचाने की सलाह देते हैं।