Lokmat Sakhi >Beauty > केसांना तेल किती वेळा लावावे आणि किती वेळ ठेवावे ? रात्रभर तेल तसेच ठेवता तर पाहा काय चुकते

केसांना तेल किती वेळा लावावे आणि किती वेळ ठेवावे ? रात्रभर तेल तसेच ठेवता तर पाहा काय चुकते

How often should you apply oil to your hair and for how long? If you apply oil for overnight, see what happens : केसांना तेल लावणे गरजेचेच. मात्र किती वेळा लावता ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2025 14:00 IST2025-09-12T13:55:56+5:302025-09-12T14:00:21+5:30

How often should you apply oil to your hair and for how long? If you apply oil for overnight, see what happens : केसांना तेल लावणे गरजेचेच. मात्र किती वेळा लावता ?

How often should you apply oil to your hair and for how long? If you apply oil for overnight, see what happens | केसांना तेल किती वेळा लावावे आणि किती वेळ ठेवावे ? रात्रभर तेल तसेच ठेवता तर पाहा काय चुकते

केसांना तेल किती वेळा लावावे आणि किती वेळ ठेवावे ? रात्रभर तेल तसेच ठेवता तर पाहा काय चुकते

केसांना पोषण देण्यासाठी आणि त्यांची नैसर्गिक चमक टिकवण्यासाठी तेल लावणे ही पारंपारिक पद्धत आहे. केसांच्या पोषणासाठी तेल फार फायद्याचे ठरते. पण अनेकांना याबाबत शंका असते की केसांना किती वेळा तेल लावावे आणि ते डोक्यावर किती वेळ ठेवावे. अनेक जणांना असे वाटते की जितके जास्त तेल लावू तितके केस छान होतात. मात्र मुळात ही संकल्पना चुकीची आहे. (How often should you apply oil to your hair and for how long? If you apply oil for overnight, see what happens)शक्यतो आठवड्यातून दोन ते तीन वेळा तेल लावतात. वारंवार किंवा दररोज तेल लावल्याने टाळू अत्यंत तेलकट होतो आणि त्यामुळे चिकट व्हायला लागतात. यामुळे केसांच्या मुळांमध्ये घाण अडकून कोंडा वाढू शकतो आणि काही वेळा केस गळायलाही लागतात. तेलाच्या अति माऱ्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे तेल लावण्याआधी किती वेळा लावावे आणि कसे लावावे हे जाणून घ्या.  

१. तेल लावल्यानंतर ते डोक्याच्या त्वचेत व्यवस्थित मुरण्यासाठी दोन ते तीन तासांचा वेळ पुरेसा असतो. या वेळेत टाळूला पोषण मिळते. छान मसाज केला तर आरामही मिळतो. रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळते. काही लोक तेल रात्रीभर ठेवतात. ज्यांची त्वचा तेलकट आहे. त्यांना रात्रभर तेल ठेवणे त्रासाचे ठरु शकते. त्वचा जास्त तेलकट होते आणि परिणाम उलटा होतो. कपाळावर पिंपल्स आणि बारीक पुरळही उठतं.


  
२. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी या बाबतीत अधिक काळजी घ्यायला हवी. वारंवार तेल लावल्याने मुरुम, टाळूवर खाज किंवा पुरळ येण्याचा धोका असतो. अशा वेळी हलक्या स्वरुपाचे तेल वापरणे योग्य ठरते, जसे नारळाचे, बदामाचे तेल. ही तेल कमी चिकट असून टाळूला आवश्यक पोषण देतात आणि त्रास कमी करतात. त्याचबरोबर तेल लावताना ते थोड्या प्रमाणात घेऊन बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मसाज करावा, त्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केस अधिक निरोगी होतात. आठवड्यातून एकदाच तेल लावा. तसेच जास्त वेळ ठेवणे टाळा. 

३. खरं तर तेल लावण्याचा उद्देश म्हणजे केसांच्या मुळांना ताकद देणे, टाळूला आवश्यक आर्द्रता पुरवणे आणि कोरडेपणा कमी करणे हा असतो. त्यामुळे तल मुळांशी लावा. केसांना खाली भरपूर तेल लावणे अजिबात गरजेचे नसते. जास्त प्रमाणात किंवा जास्त वेळ तेल लावून ठेवणे हे चांगले ठरत नाही. संतुलित प्रमाणात, योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने केलेला तेलाचा वापरच केसांना मजबूत, मऊसर आणि चमकदार ठेवू शकतो. 

Web Title: How often should you apply oil to your hair and for how long? If you apply oil for overnight, see what happens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.