त्वचेची काळजी घेण्याची पहिली पायरी म्हणजे चेहरा स्वच्छ करणं. त्वचा स्वच्छ करण्यासाठी चेहरा धुतला जातो. पण, जर चेहरा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने धुतला गेला नाही तर त्वचा लवकर खराब होऊ शकते. चेहऱ्यावर डेड स्किन सेल्स चिकटून राहू शकतात. तसेत जर चेहरा जास्त प्रमाणात धुतला गेला तरी देखील त्वचेला नुकसान पोहोचवू शकतं. अशा परिस्थितीत, दिवसातून नेमका किती वेळा चेहरा धुवावा हे जाणून घेऊया...
दिवसातून दोनदा चेहरा धुवावा. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुणं महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ केला तर चेहऱ्यावर लावलेले कोणतेही उत्पादन त्वचेमध्ये चांगले शोषले जाते. त्याच वेळी, रात्री चेहरा धुणं महत्वाचे आहे जेणेकरून दिवसभराची धूळ आणि मेकअप त्वचेवरून निघून जाईल. अशा परिस्थितीत दिवसातून दोनदा चेहरा धुणं गरजेचं आहे. जर तुमचा चेहरा दिवसा खूप तेलकट झाला किंवा काळपट दिसू लागलात तर चेहरा धुवून घ्या.
'या' गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं
- चेहरा धुताना, तुम्ही वापरत असलेले क्लींजर तुमच्या स्किन टाईपनुसार आहे याची विशेष काळजी घ्या.
- जर क्लींजर तुमच्या स्किन टाईपनुसार नसेल तर चेहरा व्यवस्थित स्वच्छ होणार नाही.
- चेहरा धुतल्यानंतर, टोनर आणि मॉइश्चरायझर लावा. जरी टोनर लावला नाही तरी मॉइश्चरायझर लावणं खूप महत्त्वाचं आहे.
- बबल्स किंवा कण असलेले फेसवॉश निवडणं टाळा, ज्यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं.
- तुमचा चेहरा आधी ओला करा आणि फेसवॉश लावा.
- २० ते ३० सेकंद चेहऱ्यावर फेसवॉशने मसाज केल्यावर चेहरा धुवा आणि स्वच्छ करा.
- चेहरा धुतल्यानंतर तो हलक्या हाताने पुसून घ्या.