दररोज सकाळी आंघोळ करताना, आपल्यापैकी बहुतेक जण साबणाने आंघोळ करतात.(How often to use soap) कारण आपल्याला वाटतं की साबणाशिवाय आंघोळ करणं म्हणजे घाण सोडणे.(Daily soap bath effects) आपण रोज सकाळी साबणाने आंघोळ करतो खरं पण रोज शरीरासाठी साबण वापरणं नेहमीच चांगलं नसतं.(Skin care tips) तज्ज्ञ म्हणतात की रोज त्वचेसाठी साबण वापरल्याने त्वचेचा नैसर्गिक ओलावा आणि तेलाचे संतुलन बिघडते. ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते.
साबणात केमिकल्स, कृत्रिम सुगंध आणि जास्त फेस तयार करणारे घटक असतात. जे त्वचेचं नैसर्गिक संतुलन बिघडवतात.(Bath routine mistakes) ज्या लोकांची त्वचा कोरडी, संवेदनशील किंवा ऍलर्जी असते. त्यांनी रोज त्वचेला साबण वापरणं नुकसानकारक ठरु शकते.(Healthy bathing habits) त्वचारोगतज्ज्ञ सांगतात की, आठवड्यातून दोन ते तीन वेळा साबणाने शरीर स्वच्छ करणं पुरेसं असतं.(Soap usage frequency) बाकीच्या दिवसांत फक्त साधं कोमट पाणी, किंवा हलकं हर्बल बॉडीवॉश वापरणं योग्य ठरतं.
साबण किती वेळा वापरावा?
- आठवड्यातून फक्त २ ते ४ वेळा साबणाने आंघोळ करणं पुरेसे आहे.
- बाकीच्या दिवसांमध्ये आपण कोमट पाण्याने आंघोळ करुन आपलं शरीर स्वच्छ करु शकतो.
- कोमट पाणी त्वचेवरील धूळ आणि घाम काढून टाकते आणि त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ ठेवते.
- यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल टिकून राहते आणि त्वचा देखील मऊ राहते.
- बाजारात मिळणाऱ्या साबणात रासायनिक सुगंध असतात. जे त्वचेसाठी रोज वापरल्याने नुकसान होते.
रोज साबण वापरल्याने काय होईल?
- रोज साबण वापरल्याने त्वचेतील नैसर्गिक ओलावा नष्ट होतो.
- त्वचेला कोरडेपणा, खाज सुटणे आणि त्वचा सोलणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
- संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना ऍलर्जी किंवा पुरळ देखील येऊ शकतात.
- दररोज साबणाने आंघोळ करणं आवश्यक नाही परंतु त्वचेसाठी हानिकारक ठरु शकते.