Join us

पावसाळ्यात अधिक घ्या पायांची काळजी, इन्फेक्शनपासून बचावासाठी फॉलो करा सोप्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:54 IST

Monsoon Foot Care Tips : पावसाच्या दिवसांमध्ये पायांची अधिक काळजी घ्यावी लागते.  या दिवसांमध्ये पायांची काळजी कशी घ्याल याबाबत काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Monsoon Foot Care Tips : पावसाला सुरूवात झाल्यावर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. सर्दी, खोकला, ताप अशा कॉमन समस्या होतच राहतात. सोबतच त्वचेसंबंधी देखील समस्या होतात. पावसामुळे रस्त्यांवर जिकडे-तिडके पाणी साचलेलं असतं या पाण्यातून चालत असाल किंवा या पाण्यात शूज-चपला भिजल्या असतील तर पायांसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. त्यामुळेच पावसाच्या दिवसांमध्ये पायांची अधिक काळजी घ्यावी लागते.  या दिवसांमध्ये पायांची काळजी कशी घ्याल याबाबत काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पायांची काळजी कशी घ्याल?

पायांना मोहरीचं तेल लावा

झोपण्याआधी पायांची स्वच्छता करम्यासाठी तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता. मोहरीचं तेल गरम करा आणि पायांवर लावा. मोहरीच्या तेलात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल तत्व असतात जे पायांचा फंगल इन्फेक्शनपासून बचाव करतात.

भिजलेले शूज-चप्पल घालू नका

पावसाळ्यात अनेकदा चप्पल किंवा शूज भिजतात. जे वापरल्यास फंगल इन्फेक्शनचा धोका असतो. फंगल इन्फेक्शन झाल्यास पायांवर खाज आणि जळजळ होते. अशात भिजलेली चप्पल किंवा शूज वापरणं टाळलं पाहिजे. शूज-चपला वेळोवेळी स्वच्छ करा, कोरड्या करा.

तीन ते चार वेळा धुवा पाय

या दिवसात पाय दिवसातून तीन ते चार वेळा आवर्जून धुवावे. पाय कोमट पाण्यानं आणि साबणानं स्वच्छ धुवावे. नंतर पाय थंड पाण्यानं धुवावे. पाय केवळ धुवून चालत नाही तर कोरड्या कापडानं पाय लगेच पुसावे. या दिवसात पायांवर किंवा बोटांच्या मधे मळ अजिबात राहू देऊ नका.

मळलेले सॉक्स टाळा

पावसाळ्यात मळलेल्या किंवा दुर्गंधी येणाऱ्या सॉक्सचा वापर टाळा. जर तुम्ही घरीच पेडीक्योर करणार असाल तर याची काळजी घ्या की, तुम्ही जे प्रॉडक्ट वापरत असाल ते तुमच्या पायांना सूट होईल असंच वापरा. पाय दगडानं किंवा कापडानं घासून स्वच्छ केले पाहिजे.

फूट स्क्रबर

या दिवसात खासकरून पायांची टाच घासून घासून स्वच्छ करावी. यासाठी तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या फूट स्क्रबरचा वापर करू शकता. झोपतानाही पाय स्वच्छ धुवावे आणि मॉइश्चरायजर लावावं. तसेच या दिवसात नखेही जास्त लांब ठेवू नये. लांब नखांमुळेही आजार होऊ शकतात.

नखं साफ करा

नखांमध्ये माती जमा झाली तर बॅक्टेरिया जमा होऊ तुम्ही आजारी पडू शकता. जर असं वाटत असेल की, पायांवर सूज आली आहे की, गरम पाण्यात तुरटी टाकून त्यात १० ते १५ मिनिटांसाठी पाय ठेवून बसा. हा उपाय आठवड्यातून ३ ते ४ वेळा केल्यास पायांची सूज दूर होईल. 

जास्त वेळ पाण्यात राहू नका

पावसाच्या पाण्यात पाय जास्त वेळ भिजले तर पायांवर पुरळ येते. हे दिसायला जरी छोटे दिसत असले तरी मांसाच्या आत गाठ तयार होते. नंतर जोरदार वेदनाही होऊ लागतात. तसेच पाय खाली ठेवल्यावर टोचल्यासारखंही वाटतं. पायांवर अशाप्रकारची पुरळ आली तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स