सध्याच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये प्रत्येकालाच असं वाटतं की आपला चेहरा ग्लोईंग दिसावा. यासाठी बरेच लोक महागडी उत्पादनं वापरतात. पण किचनमधील काही पदार्थ चेहऱ्याला लावून तुम्ही सुंदर, ग्लोईंग चेहरा मिळवू शकता. ज्यामुळे वाढत्या वयातही तुम्ही तरूण, सुंदर दिसाल (How Do I Make My Face Glow Naturally). काही सोपे उपाय करून तुम्ही त्वचेसाठी ग्लो क्रिम तयार करू शकता. (Use These Homemade Cream At Night To Get Glowing Skin)
घरच्याघरी ग्लो क्रिम कशी तयार करावी?
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी २ चमचे एलोवेरा जेल, १ चमचा ग्लिसरिन आणि १ चमचा गुलाब पाणी मिसळा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर त्यात ४ ते ५ थेंब नारळाचे तेल मिसळू शकता. हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळून एका स्वच्छ डब्यात ठेवा. ही क्रिम त्वचेला हायड्रेट ठेवते आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक देते. रोज रात्री झोपण्याआधी चेहऱ्याला हलक्या हातानं लावा.
चेहऱ्यावर लगेच ग्लो आणण्यासाठी काय लावावं?
जर एखाद्या खास प्रसंगासाठी तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर मध आणि लिंबाचा वापर करा. १ चमचा मधात काही थेंब लिंबू घालून चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी साध्या पाण्यानं चेहरा धुवून घ्या. ज्यामुळे चेहरा फ्रेश आणि ब्राईट दिसेल. याव्यतिरिक्त बेसन, दही, हळदीचा पॅक लावून तुम्ही इंस्टंट ग्लो मिळवू शकता.
रात्री चेहऱ्याला काय लावावं?
रात्रीची वेळ ही स्किन रिपेअर होण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ असते. सगळ्यात आधी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. त्यानंतर यात एलोवेरा जेल किंवा घरी बनवलेली फेस ग्लो क्रिम लावा. नंतर हलक्या हातानं मसाज करा. जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन चांगले राहील. त्वचा खूपच कोरडी झाली असेल तर तुम्ही यात २ थेंब बदामाचे तेलही लावू शकता. ज्यामुळे त्वचा कोरडी आणि ग्लोईंग दिसून येते.
सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर काय करावं?
सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर थंड पाणी मारा यामुळे त्वचा फ्रेश दिसते आणि पोर्स घट्ट होतात त्यानंतर हलक्या हातानं क्लिंजरचा वापर करा किंवा गुलाबपाणी, टोनर लावा. दिवसभरात कुठेही बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन लावायला विसरू नका. ही छोटी सवय तुमचा चेहरा दिवसभर ग्लोईंग आणि हेल्दी ठेवण्यास मदत करेल.
