Skin Care: धूळ, प्रदूषण, चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी यांमुळे अनेकांना त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. यातील एक कॉमन समस्या म्हणजे पिंपल्, अॅक्ने. अॅक्ने म्हणजे त्वचेवर येणारी लाल-पांढरी पुरळ. त्वचेची योग्य काळजी न घेणे आणि खराब गट हेल्थमुळे ही अॅक्नेही समस्या होऊ शकते. चेहऱ्यावर पुरळ येत असेल तर त्वचेचं टेक्स्चर खराब होऊ लागतं. तसेच मेकअप करण्यातही अडथळा येतो आणि त्वचेवरील पुरळमुळे वेदनाही होतात. याबाबत डर्मेटोलॉजिस्ट डॉ. जुश्या सरीन यांनी माहिती देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. खराब गट हेल्थ ठीक करण्यासाठी काय खायला हवं हे त्यांनी सांगितलं.
खराब गट हेल्थ आणि अॅक्ने
डर्मेटोलॉजिस्ट डॉ. जुश्या यांनी सांगितलं की, बद्धकोष्ठता किंवा पचनक्रियेत गडबडमुळे अॅक्ने होण्याचं कारण आहे चुकीचं खाणं-पिणं. हाय फॅट किंवा प्रोसेस्ड फूडमध्ये फायबर अजिबात नसतं, ज्यामुळे गट मुव्हमेंटमध्ये बदल होऊ लागतो आणि यामुळे नॉर्मल हेल्दी बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे गट लायनिंगमध्ये छोटे छोटे गॅप्स तयार होतात, ज्यामुळे विषारी तत्व बॉडी सिस्टीममध्ये शिरतात.
अशात ज्या लोकांची त्वचा अॅक्ने प्रोन आहे म्हमजे ज्यांच्या त्वचेवर भरपूर पुरळ येते, त्यांना या इन्फ्लेमेशन आणि ऑइलच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रॉडक्शनमुळे अॅक्ने जास्त होतात.
अॅक्नेची समस्या दूर करण्यासाठी काय खावं?
- खराब गट हेल्थमुळे अॅक्नेची समस्या असेल तर यासाठी प्रोबायोटिक्स भरपूर असलेले पदार्थ खावेत.
- दही हे एक बेस्ट प्रोबायोटिक फूड आहे. दही खाल्ल्यानं गुड गट बॅक्टेरिया वाढतात. तसेच दही खाल्ल्यानं पचन तंत्रही मजबूत राहतं आणि यामुळे गट हेल्थही चांगली राहते.
- लसूणही प्रोबायोटिक फूड्सच्या यादीत येतं. लसणाच्या मदतीनं गुड गट बॅक्टेरिया वाढतात. तसेच लसूण खाल्ल्यानं शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात.
- ताक सुद्धा एक प्रोबायोटिक फूड आहे. अनपेस्चुराइज्ड ताक प्यायल्यास गट हेल्थला खूप फायदे मिळतात.