Lokmat Sakhi >Beauty > गरम - थंड की कोमट? त्वचेच्या प्रकारानुसार चेहरा धुण्यासाठी कोणते पाणी वापरावे - डर्मेटोलॉजिस्ट सांगतात...

गरम - थंड की कोमट? त्वचेच्या प्रकारानुसार चेहरा धुण्यासाठी कोणते पाणी वापरावे - डर्मेटोलॉजिस्ट सांगतात...

Hot vs Cold Water For Face Wash Dermatologist Shares Easy Way To Keep The Skin Healthy : hot water vs cold water for face wash : best water temperature for face wash : how to wash face correctly : सुंदर त्वचेसाठी किंवा त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी चेहरा धुण्यासाठी नेमकं कोणतं पाणी वापरावं ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2025 13:34 IST2025-08-13T13:19:47+5:302025-08-13T13:34:16+5:30

Hot vs Cold Water For Face Wash Dermatologist Shares Easy Way To Keep The Skin Healthy : hot water vs cold water for face wash : best water temperature for face wash : how to wash face correctly : सुंदर त्वचेसाठी किंवा त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी चेहरा धुण्यासाठी नेमकं कोणतं पाणी वापरावं ते पाहा...

Hot vs Cold Water For Face Wash Dermatologist Shares Easy Way To Keep The Skin Healthy hot water vs cold water for face wash best water temperature for face wash how to wash face correctly | गरम - थंड की कोमट? त्वचेच्या प्रकारानुसार चेहरा धुण्यासाठी कोणते पाणी वापरावे - डर्मेटोलॉजिस्ट सांगतात...

गरम - थंड की कोमट? त्वचेच्या प्रकारानुसार चेहरा धुण्यासाठी कोणते पाणी वापरावे - डर्मेटोलॉजिस्ट सांगतात...

आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि चेहरा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण बाजारातून महागडे फेसवॉश, क्रीम्स आणतो, विविध प्रकारचे स्क्रब वापरतो. पण एक गोष्ट आपण अनेकदा विसरतो, ती म्हणजे चेहरा धुण्यासाठी वापरले जाणारे पाणी. चेहरा धुणे (Hot vs Cold Water For Face Wash Dermatologist Shares Easy Way To Keep The Skin Healthy) ही आपल्या दैनंदिन स्किनकेअर (hot water vs cold water for face wash) रूटीनमधील एक महत्त्वाची पायरी आहे. पण चेहरा धुताना कोणते (best water temperature for face wash) पाणी वापरावे गरम, थंड की कोमट हा प्रश्न अनेकांना पडतो(how to wash face correctly).

चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य फेसवॉशसोबतच पाण्याचे तापमानही तितकेच महत्त्वाचे असते. अनेकजणी सवयीने कधी गरम पाणी, तर कधी थंड पाणी वापरतात, पण ते त्वचेसाठी योग्य आहे का हे मात्र तपासून पाहत नाहीत. चुकीच्या तापमानाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होणे, कोरडेपणा, लालसरपणा किंवा उलट जास्त तेलकटपणा अशा समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठीच, गरम, थंड की कोमट पाणी – कोणते तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे हे जाणून घेणे अत्यावश्यक असते. जेणेकरून त्वचा निरोगी आणि तेजस्वी राहील. सुंदर त्वचेसाठी किंवा त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी चेहरा धुण्यासाठी नेमकं कोणतं पाणी वापरावं ते पाहा... 

काय सांगतात तज्ज्ञ?

चेहरा धुण्यासाठी नेमका कोणत्या पाण्याचा वापर करावा याबाबत प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ जुशिया भाटिया सरीन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये स्किन एक्सपर्ट सांगतात की, चेहरा धुण्यासाठी तुम्ही गरम, थंड किंवा कोमट – तिन्ही प्रकारचे पाणी वापरू शकता. मात्र, त्यापूर्वी तुमचा त्वचेचा प्रकार आणि गरज लक्षात घेणे आवश्यक आहे.

व्हिटॅमिन 'ई'ची हिरवीगार कॅप्सूल त्वचेपासून केसांपर्यंत अनेक समस्यांसाठी गुणकारी, पाहा ‘कशी’ वापरायची...

कियारा अडवाणीचा आवडता फेसमास्क, तिच्या चेहऱ्यावर दिसतं तसं तेज आपल्यालाही मिळेल अगदी सहज...

गरम पाणी केव्हा वापरावे?

डॉ. सरीन यांच्या मते, जर तुमची त्वचा तेलकट (ऑयली) असेल किंवा तुम्हाला चेहऱ्यावरचा मेकअप खोलवर स्वच्छ करायचा असेल, तर हलक्या कोमट पाण्याने चेहरा धुणे फायदेशीर ठरते. कोमट पाणी त्वचेतील छिद्र (पोर्स) थोडेसे उघडण्यास मदत करतात, ज्यामुळे तेल, धूळ आणि मेकअप सहजपणे निघून जातात. यासोबतच, हातापायांवरील केस काढण्यासाठी शेव्हिंग करण्यापूर्वीही हलक्या कोमट पाण्याचा वापर फायदेशीर ठरतो, कारण यामुळे केस मऊ होतात आणि रेझर सहजपणे फिरतो.

थंड पाण्याने चेहरा कधी धुवावा ?

जर तुमच्या चेहऱ्यावर सूज, पफीनेस किंवा इन्फ्लेमेशनची समस्या असेल, तर थंड पाण्याने चेहरा धुणे सर्वोत्तम ठरते. थंड पाणी त्वचेला लगेच ताजेतवाने करते, रक्ताभिसरण सुधारते आणि पफीनेस कमी करते. मेकअप करण्यापूर्वीही थंड्या पाण्याने चेहरा धुणे फायदेशीर असते, कारण यामुळे त्वचेवरील छिद्र (पोर्स) टाईट होतात आणि मेकअप अधिक स्मूथ व नैसर्गिक दिसतो.

आईबाबांसोबत आता लहान मुलांचेही केस होतात पांढरे, काळ्या केसांसाठी पाहा ‘हा’ उपाय-टाळा केमिकल...

नॉर्मल पाण्याने चेहरा केव्हा धुवावा?

रोजच्या वापरासाठी डर्मेटोलॉजिस्ट नॉर्मल पाण्याने चेहरा धुण्याचा सल्ला देतात. विशेषत: जर तुमची त्वचा सेंन्सेन्टिव्ह असेल, तर नॉर्मल पाण्याचाच वापर करा. यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेलाचे संतुलन टिकून राहते आणि त्वचेची जळजळ होण्याची शक्यता कमी होते. स्किन एक्सपर्टच्या मते, चेहरा धुताना अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्ही तुमची त्वचा हेल्दी, फ्रेश आणि ग्लोइंग ठेवू शकता.


Web Title: Hot vs Cold Water For Face Wash Dermatologist Shares Easy Way To Keep The Skin Healthy hot water vs cold water for face wash best water temperature for face wash how to wash face correctly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.