आजकालच्या धावपळीच्या आणि सतत बदलत राहणाऱ्या लाईफस्टाईलमध्ये त्वचेची योग्य काळजी घेणं थोडंसं दुर्लक्षित होतं. कितीही वेळा ठरवलं तरी त्वचेची पुरेशी काळजी घेण्यासाठी वेळच मिळतं नाही. धूळ-माती, घाम आणि प्रदूषणामुळे त्वचेवर डेड स्किन साचतात, त्यामुळे त्वचा निस्तेज आणि रफ दिसू लागते. त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसावी असं प्रत्येकीलाच वाटतं, यासाठी त्वचेचे वेळोवेळी स्क्रबिंग करणे अत्यंत गरजेचे असते. त्वचेचे स्क्रबिंग करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन महागडे उपाय करण्यापेक्षा आपण घरच्याघरीच उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून घरगुती बॉडी स्क्रब तयार करु शकतो(Homemade Body Scrub).
महागडे बॉडी स्क्रब्स वापरण्यापेक्षा घरच्याघरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून तयार करता येणारा होममेड बॉडी स्क्रब हा उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरतो. नैसर्गिक घरगुती पदार्थांनी तयार केलेला स्क्रब त्वचा खोलवर स्वच्छ करतो, मृत त्वचा काढून टाकतो आणि त्वचेला नैसर्गिक मऊपणा व चमक देतो. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून तयार होणारे बॉडी स्क्रब (homemade scrub for glowing skin) त्वचेला कोणताही त्रास न होता नैसर्गिक ग्लो देतात. हे स्क्रब नेमके कसे बनवायचे आणि ते वापरण्याची योग्य पद्धत काय ते पाहूयात.
घरगुती होममेड स्क्रब तयार करण्यासाठी...
१. पिठीसाखर - ३ टेबलस्पून २. तांदूळाचे पीठ - १ टेबलस्पून ३. बेबी शाम्पू / बेबी बॉडी वॉश - २ टेबलस्पून ४. मध - २ टेबलस्पून ५. खोबरेल तेल - २ टेबलस्पून ६. बीटरुट पावडर - २ टेबलस्पून
कृती :-
एका मध्यम आकाराच्या काचेच्या बरणीत सर्वातआधी पिठीसाखर घेऊन त्यात तांदूळाचे पीठ, बेबी शाम्पू / बेबी बॉडी वॉश घालावे. मग याच मिश्रणात मध, खोबरेल तेल, बीटरुट पावडर असे सगळे घटक एकत्रित घालून चमच्याने मिसळून घ्यावे. घरगुती बॉडी स्क्रब वापरण्यासाठी तयार आहे.
डिलिव्हरीनंतर केस गळतात-त्वचा निस्तेज झाली? चमचाभर हिरव्यागार बिया खा, बदलून जाईल तुमचे रुप...
'नो पेंडेंट' मंगळसुत्रांचे १० युनिक डिझाईन्स! कमी सोन्यातही जास्त भारी - सिंपल युटीफुल नवा ट्रेंड...
बॉडी स्क्रब वापरण्याची योग्य पद्धत...
हे स्क्रब त्वचेवर लावण्यापूर्वी त्वचा थोडी पाणी लावून ओलसर करून घ्यावी. वर्तुळाकार पद्धतीने हाताने हलकेच दाब देत २ ते ३ मिनिटे मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून १ ते २ वेळा याचा वापर करणे पुरेसे आहे.
घरगुती बॉडी स्क्रब वापरण्याचे फायदे...
हे नैसर्गिक स्क्रब तुमच्या त्वचेसाठी एखाद्या 'मॅजिक' प्रमाणेच काम करते.
१. पिठीसाखर आणि तांदळाचे पीठ त्वचेवरील साचलेली घाण आणि डेड स्किन हळूवारपणे काढून टाकतात, ज्यामुळे त्वचा लगेच मऊ लागते.
२. बीटरूट पावडरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होऊन त्वचेला एक नैसर्गिक गुलाबी आणि तजेलदार ग्लो येतो.
३. मध आणि खोबरेल तेल हे नैसर्गिक मॉइश्चरायझर्स आहेत. स्क्रब केल्यानंतर त्वचा कोरडी पडू नये म्हणून हे घटक त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात.
४. स्क्रब करताना जेव्हा आपण हलक्या हाताने मसाज करतो, तेव्हा त्या भागातील रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे त्वचा अधिक तरुण आणि निरोगी दिसते.
Web Summary : Busy lifestyles often neglect skincare. This article provides a recipe for a homemade body scrub using readily available ingredients like sugar, rice flour, and beetroot powder. This scrub exfoliates dead skin, removes tan, and provides a natural glow, offering a cost-effective alternative to expensive parlor treatments.
Web Summary : व्यस्त जीवनशैली में त्वचा की देखभाल अक्सर छूट जाती है। यह लेख चीनी, चावल का आटा और चुकंदर पाउडर जैसी आसानी से उपलब्ध सामग्री का उपयोग करके घर पर बॉडी स्क्रब बनाने की विधि प्रदान करता है। यह स्क्रब मृत त्वचा को हटाता है, टैनिंग दूर करता है और प्राकृतिक चमक प्रदान करता है, जो महंगे पार्लर उपचार का एक किफायती विकल्प है।