'डाळिंब' हे फळं आरोग्यासाठी जितक फायदेशीर आहे, तितकंच त्वचेसाठी देखील अत्यंत उपयुक्त मानले जाते. बऱ्याचदा आपण डाळिंबाचा रस काढतो आणि उरलेला चोथा फेकून देतो, पण याच चोथ्यात आणि दाण्यांमध्ये तुमच्या त्वचेला तरुण ठेवण्याची ताकद असते. डाळिंबाचे दाणे हे उत्तम 'नॅचरल एक्सफोलिएटर' म्हणून काम करतात. हे स्क्रब वापरल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात आणि त्वचा अधिक घट्ट होते. त्वचेवरील डेड स्किन, टॅनिंग आणि पिंपल्स घालवण्यासाठी डाळिंबाच्या दाण्यांचे होममेड स्क्रब एक 'मॅजिकल' उपाय ठरू शकते(how to make pomegranate scrub at home).
डाळिंबाच्या दाण्यांमध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेला आतून पोषण देतात. बाजारातील महागड्या आणि केमिकलयुक्त स्क्रबमुळे अनेकदा त्वचा कोरडी पडते, मात्र डाळिंबाच्या दाण्यांचे घरगुती स्क्रब त्वचेचा ओलावा टिकवून ठेवून चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक आणते. विशेष म्हणजे डाळिंबाच्या दाण्यांचा (homemade pomegranate scrub) तयार केलेला होममेड स्क्रब त्वचेची योग्य ती काळजी घेऊन, नैसर्गिक ग्लो देतो. डाळिंबाच्या दाण्यांचा घरीच स्क्रब कसा तयार करायचा आणि त्याचे त्वचेला कोणते फायदे होतात ते पाहूयात...
डाळिंबाचा फेस स्क्रब बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. डाळिंबाचे दाणे - २ कप
२. लिंबाचा रस - २ टेबलस्पून
३. दही - २ टेबलस्पून
४. बारीक केलेली साखर - २ टेबलस्पून
कृती :-
डाळिंबाचा फेस स्क्रब बनवण्यासाठी सर्वप्रथम डाळिंबाचे दाणे हलकेसे मिक्सरयामध्ये वाटून घ्यावेत. त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेली साखर आणि थोडे दही मिसळा. आता या सर्व मिश्रणात थोडासा लिंबाचा रस घाला. यानंतर हे सर्व साहित्य नीट एकत्र करून चांगले मिसळा. मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत ते हलवत राहा. डाळिंबाचा फेस स्क्रब तयार आहे, जो त्वचा स्वच्छ आणि तजेलदार ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो.
उन्हाळ्यात किचनमध्ये स्वयंपाक म्हणजे शिक्षा, १० टिप्स- किचन राहील थंड-घामाघुम न होता करा स्वयंपाक...
कशाला रात्री उपाशी राहता ‘हे’ खा-रात्री जेवूनही कमी होईल वजन, आहारतज्ज्ञांचा सोपा वेटलॉस मंत्र...
हा फेसस्क्रब वापरण्याचे फायदे...
१. डाळिंबाच्या सालींमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे घटक त्वचेवरील सुरकुत्या, बारीक रेषा आणि वाढत्या वयाच्या खुणा कमी करण्यास मदत करतात. हे त्वचेतील 'कोलेजन' वाढवते, ज्यामुळे त्वचा घट्ट आणि तरुण दिसते.
२. हे स्क्रब त्वचेवरील डेड स्किन काढून टाकते. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि त्वचेचे टेक्श्चर मऊ आणि गुळगुळीत होते.
३. हे स्क्रब त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेतात आणि पिंपल्स, ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्सची समस्या कमी करतात.
४. जर उन्हामुळे तुमची त्वचा काळवंडली असेल तर डाळिंबाच्या सालीचा वापर एखाद्या 'सनस्क्रीन' सारखा काम करतो. हे त्वचेवरील काळे डाग आणि पिगमेंटेशन हलके करण्यास मदत करते.
५. प्रदूषणामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण आणि विषारी घटक बाहेर काढण्यासाठी हे एक उत्तम 'डिटॉक्स एजंट' आहे.
