Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा घरगुती नाईट सिरम, पिग्मेंटेशन, सुरकुत्या, काळपटपणा होईल कमी- १५ दिवसांत दिसेल फरक

झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा घरगुती नाईट सिरम, पिग्मेंटेशन, सुरकुत्या, काळपटपणा होईल कमी- १५ दिवसांत दिसेल फरक

Night skincare routine for clear skin: Natural home remedies for pigmentation: आपल्या त्वचेच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून आपण रोज मॅजिकल नाईट सिरम लावू शकतो. हे सिरम घरच्या घरी फक्त ५ मिनिटांत तयार होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2026 17:00 IST2026-04-05T17:00:00+5:302026-04-05T17:00:02+5:30

Night skincare routine for clear skin: Natural home remedies for pigmentation: आपल्या त्वचेच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून आपण रोज मॅजिकल नाईट सिरम लावू शकतो. हे सिरम घरच्या घरी फक्त ५ मिनिटांत तयार होईल.

Homemade night serum for pigmentation and wrinkles Homemade night serum for pigmentation and wrinkles Best natural serum for anti-aging and dark circles Aloe vera and Vitamin E face serum recipe | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा घरगुती नाईट सिरम, पिग्मेंटेशन, सुरकुत्या, काळपटपणा होईल कमी- १५ दिवसांत दिसेल फरक

झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा घरगुती नाईट सिरम, पिग्मेंटेशन, सुरकुत्या, काळपटपणा होईल कमी- १५ दिवसांत दिसेल फरक

आपल्या प्रत्येकाला वाढत्या वयानुसार त्वचा स्वच्छ, तजेलदार आणि डागमुक्त असावी असे वाटते. वय वाढू लागले की, त्वचेवर काळी वर्तुळे, सुरकुत्या पाहायला मिळतात.(Skin Care Tips) वाढते प्रदूषण, चुकीची जीवनशैली आणि रासायनिक ब्यूटी प्रॉडक्ट्सचा अतिवापर केल्यामुळे कमी वयात पिग्मेंटेशन, सुरकुत्या आणि काळपटपणा येतो. बाजारात मिळणारी महागडी सिरम्स अनेकदा खिसा रिकामा करतात, पण हवा तसा रिजल्ट मिळत नाही. अशावेळी काही घरगुती सोपे उपाय केल्यास फरक दिसेल. (Night skincare routine for clear skin)
आपल्या त्वचेच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून आपण रोज मॅजिकल नाईट सिरम लावू शकतो. हे सिरम घरच्या घरी फक्त ५ मिनिटांत तयार होईल.(Natural home remedies for pigmentation) यात असणारे घटक त्वचेला उजळण्यास मदत करतात. हे सिरम नैसर्गिक असल्यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. पाहूया त्वचेसाठी कोणते नाईट सिरम बेस्ट आहे. 

रेशमी केस आणि 'ग्लास स्किन'साठी १० कोरियन ब्यूटी हॅक्स; सुंदर दिसण्यासाठी यापेक्षा सोपे उपाय शोधूनही सापडणार नाहीत

साहित्य
जेष्ठमध काडी: १ तुकडा 
गुलाब पाणी: अर्धी वाटी
ग्लिसरीन: १ मोठा चमचा
कोरफडीचा गर : २ मोठे चमचे
व्हिटॅमिन ई कॅप्सुल: १ 

1. सगळ्यात आधी जेष्ठमधाची काडी गुलाब पाण्यात रात्रभर भिजत घाला. सकाळी हे पाणी गाळून घ्या. यात जेष्ठमधाचे सर्व गुणधर्म उतरतात.

2. या गुलाबाच्या पाण्यात २ चमचे कोरफडीचा गर आणि १ चमचा ग्लिसरीन घालून व्यवस्थित फेटून घ्या.

3. आता यात व्हिटॅमिन ई कॅप्सुल फोडून त्यातील तेल मिक्स करा. हे सर्व घटक एकजीव झाल्यावर एका काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा.

4. हे सिरम आपण दिवसातून दोनदा लावू शकतो. सकाळी आंघोळीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी लावा. हे लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि सिरमचे काही थेंब हातावर घेऊन चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. जेष्ठमधात 'ग्लायब्रिडिन' असते, जे मेलेनिनचे प्रमाण कमी करून चेहऱ्यावरील काळे डाग आणि वांग घालवण्यास मदत करते.

5. व्हिटॅमिन ई आणि ग्लिसरीन त्वचेला हायड्रेट ठेवतात, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत आणि त्वचा तरुण दिसते. गुलाब पाणी नॅचरल टोनरचे काम करते, ज्यामुळे चेहऱ्यावरील काळपटपणा दूर होऊन नैसर्गिक चकाकी येते.हे सिरम नैसर्गिक असले तरी, चेहऱ्यावर लावण्यापूर्वी 'पॅच टेस्ट' नक्की करून पहा. हे सिरम फ्रिजमध्ये ठेवल्यास १० ते १५ दिवस चांगले टिकते.


Web Title : घरेलू नाईट सीरम: पिग्मेंटेशन और झुर्रियां कम करें, पाएं निखरी त्वचा

Web Summary : एक घरेलू नाईट सीरम पिग्मेंटेशन, झुर्रियों और काले धब्बों को कम करने में मदद कर सकता है। मुलेठी, गुलाब जल, एलोवेरा और विटामिन ई जैसे तत्वों से बना यह सीरम नियमित उपयोग से सिर्फ 15 दिनों में दृश्यमान परिणाम देने का वादा करता है।

Web Title : Homemade night serum for clear skin: Reduce pigmentation and wrinkles.

Web Summary : A homemade night serum can help reduce pigmentation, wrinkles, and dark spots. Made with ingredients like licorice root, rose water, aloe vera, and Vitamin E, this serum promises visible results in just 15 days with regular use.