सध्याची धावपळीची बिझी लाईफस्टाईल, प्रदूषण आणि वाढत्या तणावाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. अशा परिस्थितीत प्रामुख्याने, चेहरा व हातापायांच्या त्वेचेचा नॅचरल ग्लो कुठेतरी हरवतो आणि त्वचा निस्तेज दिसू लागते. त्वचेवर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी अनेकजणी थेट पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या महागड्या स्किन ट्रीटमेंट्स करुन घेतात. महागडे फेशिअल्स, केमिकल पील्स आणि स्किन ब्राइटनिंग ट्रीटमेंटवर आपण हजारो रुपये खर्च करतो. पण या ट्रीटमेंटमुळे तात्पुरती चमक मिळत जरी असली तरी, त्यातील केमिकल्स भविष्यात त्वचेचे मोठे नुकसान करू शकते. याउलट खरंतर, दुसरीकडे, आपल्या स्वयंपाकघरातच असे नैसर्गिक पदार्थ आहेत, ज्या पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंटपेक्षाही अधिक फायदेशीर आणि सुरक्षित परिणाम देऊ शकतात(homemade body oil for glowing skin).
पूर्वीच्या काळी आई - आजीने सांगितलेले घरगुती उपाय आजही तितकेच फायदेशीर ठरतात. यात ना केमिकल्सची भीती असते, ना खिशाला कात्री लागण्याची चिंता! याऐवजी नैसर्गिक घटकांपासून तयार होणारे घरगुती उपाय त्वचेला आतून पोषण देतात आणि दीर्घकाळ टिकणारा नैसर्गिक ग्लो (ayurvedic body oil for glowing skin) देण्यास मदत करतात. कमी खर्चात, कोणतेही साइड इफेक्ट्स न घेता स्किन ग्लो वाढवायचा असेल, तर हे घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या नैसर्गिक घटकांच्या मदतीने त्वचेची काळजी घेतली, तर त्वचा निरोगी, उजळ आणि चमकदार राहू शकते. नियमित आणि योग्य (coconut oil remedy for skin whitening) पद्धतीने केलेले घरगुती उपाय स्किन ग्लो वाढवण्यासाठी सुरक्षित, स्वस्त आणि फायदेशीर ठरतात.
स्किन ब्राइटनिंगचा अस्सल घरगुती उपाय...
स्किन ब्राइटनिंगचा घरगुती उपाय करण्यासाठी,४ टेबलस्पून खोबरेल तेल, १ टेबलप[सून ग्लिसरीन, १ टेबलपासून एलोवेरा जेल, अर्ध्या लिंबाचा रस इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
नेमका उपाय काय आहे ?
स्किन ब्राइटिंगसाठी घरगुती उपाय करताना नेहेमीच्याच वापरातील सहज उपलब्ध होणाऱ्या घरांतील पदार्थांच्या मदतीनेच आपण स्किन ब्राइट करु शकतो. यासाठी, सर्वात आधी एका वाटीत थोडे खोबरेल तेल घ्या. त्यामध्ये ग्लिसरीन, कोरफड जेल आणि लिंबाचा रस मिसळा. हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. घरगुती 'बॉडी ऑईल' वापरण्यासाठी तयार आहे...या तेलाच्या वापरामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येईल. मात्र, याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी हे तेल योग्य पद्धतीने वापरता येणे अत्यंत आवश्यक आहे.
स्किन ब्राइटनिंगसाठी 'हे' तेल वापरण्याची पद्धत...
सर्वात आधी या बॉडी ऑईलचे ७ ते ८ थेंब आपल्या हातावर घ्या. आता हे तेल संपूर्ण शरीरावर हलक्या हाताने मसाज करत व्यवस्थित लावून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा की, हे तेल दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ त्वचेवर लावायचे आहे. विशेष म्हणजे, उत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी हे तेल रात्रभर त्वचेवर तसेच राहू द्या. रात्री आपली त्वचा 'रिपेअर मोड' मध्ये असते, त्यामुळे तेल त्वचेत खोलवर मुरते. रोज वापर केल्याने अवघ्या काही दिवसांत त्वचेचा पोत सुधारलेला दिसेल.
स्किन ब्राईटनिंगसाठी हा घरगुती उपाय केल्याचे फायदे...
१. खोबरेल तेल आणि ग्लिसरीनच्या मिश्रणामुळे त्वचेला खोलवर पोषण मिळते, ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागते.
२. लिंबाच्या रसामध्ये नैसर्गिक 'ब्लीचिंग' गुणधर्म असतात, जे त्वचेवरील काळे डाग, पिगमेंटेशन आणि उन्हामुळे आलेलं टॅनिंग कमी करण्यास मदत करतात.
३. कोरफड जेल आणि ग्लिसरीन त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात. यामुळे कोरडी आणि निस्तेज पडलेली त्वचा मऊ आणि मुलायम होते.
४. हे तेल त्वचेला हायड्रेट ठेवते, ज्यामुळे अकाली येणाऱ्या सुरकुत्या रोखण्यास मदत होते आणि त्वचा तरुण दिसते.
५. रात्री या तेलाने मसाज केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्याचा सकारात्मक परिणाम त्वचेच्या आरोग्यावर होतो.
