Join us

चेहरा टॅन झालाय? १० रूपयांची तुरटी रात्री 'या' पद्धतीनं लावा; सकाळी तेज येईल-सुंदर दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:41 IST

Home Tan Remove Ayurvedic Beauty Secret : तुरटी पाववडर गुलाब पाण्यासोबत मिसळून चेहर्‍याला लावू शकता. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावर फ्रेशनेस येतो.

सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये चेहरा नेहमी फ्रेश आणि ग्लोईंग ठेवणं खूपच कठीण झालं आहे. धूळ, माती, प्रदूषण आणि घामामुळे चेहरा लवकर डल पडू लागतो आणि टॅनसुद्धा होतो (Beauty Tips). त्वचेवर डाग आणि पिग्मेंटेशनही वाढते. आपण ज्या स्किन केअर उत्पादनांचा वापर करतो त्याचा परीणाम जास्तवेळ टिकत नाही आणि त्वचा नॅच्युरली ग्लोईंग राहत नाही (How To Use Alum Fitkari Face Pack).

घरातला एक पदार्थ वापरून तुम्ही चकमदार चेहरा मिळवू शकता. आयुर्वेदात तुरटीचे बरेच फायदे सांगितले जातात. रात्री झोपण्याआधी तुम्ही तुटरीचा फेसपॅक बनवून चेहऱ्याला लावू शकता ज्यामुळे त्वचेवर नॅच्युरल ग्लो दिसून येतो. (How To Use Alum Fitkari Face Pack Home Tan Remove Ayurvedic Beauty Secret)

तुरटी खास का आहे?

मेडिकल न्युज टु डे च्या रिपोर्टनुसा  तुरटी दिसायला एका ट्रांसपरेंट क्रिस्टलप्रमाणे एसते. याचे एंटीसेप्टीक आणि एंटीबॅक्टेरिअल गुण त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे स्किन सेल्स कमी करतात येतात. डाग हलके होतात आणि ओपन पोस्ट टाईट होतात. डोळ्यांची सूज, चेहऱ्याचं टॅनिंग कमी होतं आणि त्वचा सॉफ्ट दिसते. (Ref)

तुरटीचा वापर चेहऱ्यासाठी कसा करावा?

अर्धा चमचा तुरटी पावडर घ्या आणि अर्धा चमचा नारळाचं तेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट रात्री चेहऱ्याला लावून ठेवा १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. तुम्ही अर्ध्या तासासाठीसुद्धा असंच ठेवू शकता. नंतर हलक्या हातानं चेहरा धुवा.

गुलाब पाण्यासोबत तुरटी

तुरटी पाववडर गुलाब पाण्यासोबत मिसळून चेहर्‍याला लावू शकता. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावर फ्रेशनेस येतो.

हळद आणि तुरटीचा फेसपॅक

एक चमचा तुरटीची वापडर अर्धा चमचा हळद आणि थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट २० मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवा. हा पॅक त्वचेचे लहानात लहान केस काढून टाकेल आणि त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकवण्यासही मदत करेल.

तुरटी आणि मधाचा फेसपॅक

एक चमचा तुरटीची पावडर, एक चमचा मध आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट २० ते ३० मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. ज्यामुळे त्वचा सॉफ्ट आणि ब्राईट होईल. तुरटीचा रेग्युलर वापर केल्यास चेहऱ्यावरचे डाग कमी होतील आणि नैसर्गिक ग्लो टिकून राहील.

English
हिंदी सारांश
Web Title : Remove tan with alum: Natural beauty secrets revealed for glowing skin.

Web Summary : Alum offers antiseptic benefits for glowing skin. Use alum powder with coconut oil, rose water, turmeric, or honey to reduce tan, tighten pores, and achieve a natural glow. Regular use diminishes blemishes.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी