Join us

महागडी ट्रीटमेंट कशाला, 'या' घरगुती उपायांनीही दूर करू शकता त्वचेवरील चामखीळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:22 IST

How to Remove Mole : अनेकजण या चामखीळ शरीरावरून हटवण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करतात. पण काही असेही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे चामखीळ दूर केली जाऊ शकते. 

How to Remove Mole : अनेक लोक असे असतात ज्यांच्या त्वचेवर मोस म्हणजेच चामखीळ असते. काहींच्या अंगावर तर भरपूर चामखीळ असतात. ज्यामुळे लोक वैतागलेले असतात. कारण त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात अडथळा निर्माण होत असतो. अशात अनेकजण या चामखीळ शरीरावरून हटवण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करतात. पण काही असेही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे चामखीळ दूर केली जाऊ शकते. 

चामखीळ दूर कऱण्याचे घरगुती उपाय

1) बटाट्याचा रस : बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करून चामखीळीवर लावल्यानं ती हळूहळू कमी होण्यास मदत होते. हा उपाय नियमित केल्यानं फायदा मिळेल.

2) लिंबाचा रस : लिंबाचा रस चामखीळीच्या जागेवर लावल्यानं समस्या दूर होते. कापसाने लिंबाचा रस मोसेवर लावा आणि त्यावर कापूस काही वेळांसाठी तसाच ठेवा. 

3) अॅपल व्हिनेगर : मोसची म्हणजेच चामखीळची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी हे अधिक फायदेशीर असतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने मोसवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर मोसचा रंग बदलेल. 

4) अननसाचा रस : मोसपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु शकता. कारण या सगळ्यांमध्ये मोस दूर करण्यासाठीचं ऐजाईम्स असतात.

5) बेकिंग सोडा : बेकिंग सोडा मोसवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ती पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.

6) लसूण : लसणाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. त्वचेसाठी देखील लसूण तेवढाच फायदेशीर आहे. लसणाची पाकळी मोसवर घासा किंवा त्याची पेस्ट मोसवर लावा. असं केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स