Forehead Tanning Home Remedy : चमकदार आणि डाग नसलेली त्वचा प्रत्येकालाच हवी असते. मात्र फारच कमी लोकांची त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि ग्लोइंग असते. बऱ्याच लोकांनी त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या असतात. अनेकदा चेहरा स्वच्छ दिसतो, पण कपाळावर जास्त टॅनिंग झालेली असते. त्यामुळे चेहऱ्याच्या पुढील भागात कपाळ काळवंडलेले आणि मळकट दिसतं. यामुळे काही वेळा लोकांना कपाळामुळे लाज वाटते. टॅनिंगमुळे चेहरा आणि कपाळाचा रंग वेगवेगळा दिसू लागतो. आज आपण काही घरगुती उपायांच्या मदतीने कपाळावरील टॅनिंग कशी सहज दूर करता येईल, ते पाहूया.
कपाळावरील टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती उपाय
हळद
हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, त्यामुळे ती त्वचेशी संबंधित समस्यांवर खूप प्रभावी ठरते. कपाळावरील काळपटपणाही हळदीमुळे कमी करता येतो. हळद कच्च्या दुधात मिसळा आणि तयार झालेला लेप टॅनिंग झालेल्या भागावर लावा. काही वेळाने थंड पाण्याने कपाळ धुवा. नियमित वापराने टॅनिंग हळूहळू कमी होईल.
काकडी
काकडी आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही अतिशय फायदेशीर आहे. काकडी लावल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतातच, शिवाय पोषक घटकांनी भरलेली काकडी टॅनिंगही कमी करते. टॅनिंग झालेल्या भागावर काकडीचे काप चोळा आणि सुमारे ३० मिनिटे तसेच ठेवा. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
बदाम तेल
बदाम तेलात असलेले व्हिटामिन्स त्वचेसाठी खूप उपयुक्त असतात. यामुळे त्वचा मऊ होते आणि कपाळावरील काळे डाग व टॅनिंग कमी होण्यास मदत होते. बदाम तेलात थोडे दूध पावडर आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट कपाळावर लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
कच्चे दूध
कच्चे दूध त्वचेवरील मळ सहज काढून टाकते. यामुळे टॅनिंगही कमी होते. कच्च्या दुधात गुलाबजल मिसळून कपाळावर हलक्या हाताने मसाज केल्यास टॅनिंगची समस्या दूर होण्यास मदत होते.
Web Summary : Remove forehead tanning easily with home remedies like turmeric, cucumber, almond oil, and raw milk. These natural ingredients help lighten dark spots and even out skin tone for a glowing complexion.
Web Summary : हल्दी, खीरा, बादाम तेल और कच्चे दूध जैसे घरेलू उपचारों से माथे का कालापन आसानी से दूर करें। ये प्राकृतिक सामग्रियां काले धब्बों को हल्का करने और त्वचा की टोन को निखारने में मदद करती हैं।