Join us

डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांमुळे चेहरा निस्तेज-म्हातारा दिसतो? ४ उपाय-काही दिवसात डार्क सर्कल गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 14:26 IST

Dark Circles Removal Home Remedies: डोळ्यांखाली काळ्या वर्तुळांची समस्या झटपट दूर करून चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.

Dark Circles Removal Home Remedies: डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांमुळे चेहऱ्याचं सौंदर्य हिरावलं जातं. नको त्या वेळी डोळ्यांखाली ही काळी वर्तुळं होतात आणि टेंशन वाढतं. थकवा, कमी झोप, तणाव या कारणांमुळे ही काळी वर्तुळं डोळ्यांखाली दिसतात. जास्तीत जास्त महिलांना ही समस्या नेहमीच होते. अशात ही समस्या झटपट दूर करून चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता. पाहुयात असेच काही सोपे उपाय जे डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर करतील.

बटाटे

डार्क सर्कल म्हणजे काळी वर्तुळं गायब करण्यासाठी बटाटे खूप फायदेशीर ठरतात. बटाटे किसून त्यांना रस एका वाटीत काढा. हा रस रूईच्या मदतीनं डोळ्यांखाली लावा आणि १० मिनिटं तसाच ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्यानं धुवा. रोज हा उपाय कराल तर फायदा मिळेल.

गुलाबजल आणि टी बॅग्स

डोळ्याखालची काळी वर्तुळं दूर करायची असेल तर गुलाबजल आणि टी बॅग्सचा वापरही करू शकता. यानं डोळ्यांना थंडावा मिळतो आणि आराम मिळतो. टी बॅग्सवर गुलाबजल टाकून डोळ्यांवर ठेवा. १० मिनिटं तसेच ठेवा. नंतर डोळे थंड पाण्यानं धुवा.

खोबऱ्याचं तेल

खोबऱ्याचं तेलही डार्क सर्कल दूर करण्यास फायदेशीर असतं. सोबतच त्वचेसाठीही फायदेशीर असतं. डार्क सर्कल घालवण्यासाठी त्यावर खोबऱ्याचं तेल लावा. रोज रात्री झोपण्याआधी डोळ्यांखाली हे तेल लावा आणि हलक्या हातानं मसाज करा.

बदामाचं तेल

बदामाचं तेल डोळ्यांखालील डार्क सर्कल दूर करण्यास मदत करतं. यासाठी रात्री झोपण्याआधी बदामचं तेल डोळ्यांखाली लावा आणि हलक्या हातानं मसाज करा. रोज हा उपाय केला तर फरक दिसून येईल.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स