Hair Removing Home Remedy : शरीरावर किंवा चेहऱ्यावर असलेले अनावश्यक केस फक्त दिसण्यावर परिणाम करत नाहीत, तर आत्मविश्वासही कमी करतात. आजकाल या केसांना काढण्यासाठी लेझर, व्हॅक्सिंग, सलून ट्रीटमेंट यांसारख्या पद्धती कॉमन झाल्या आहेत. पण त्या महाग, वेदनादायक आणि कधी-कधी त्वचेला नुकसानदायकही ठरू शकतात.
जर तुम्हीही वारंवार पार्लरला जाऊन थकल्या असाल किंवा या पद्धतींमुळे साइड इफेक्ट्सची भीती वाटत असेल, तर आता वेळ आहे जुने घरगुती उपाय करण्याची. हे उपाय केवळ प्रभावीच नाहीत, तर त्वचेला कोणतंही नुकसानही करत नाहीत. या उपायांसाठी लागणाऱ्या वस्तू प्रत्येक घरात सहज उपलब्ध असतात. चला तर मग जाणून घेऊया अनावश्यक केस काढण्यासाठीचे काही नैसर्गिक उपाय.
बेसन आणि हळदीचा पॅक
बेसन आणि हळद एकत्र करून त्यात पाणी किंवा दूध घालून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट अनावश्यक केस असलेल्या भागावर लावा. सुकल्यावर हलक्या हातांनी घासून काढा. नियमित वापराने केस मुळापासून निघून जातात आणि त्वचा स्वच्छ दिसते.
पपई आणि हळदीची पेस्ट
कच्च्या पपईचा पेस्ट तयार करून त्यात चिमूटभर हळद मिसळा. ही पेस्ट त्वचेवर लावा आणि १५ मिनिटांनी धुवा. हा उपाय केसांच्या मुळांना कमकुवत करतो आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो देतो.
साखर, लिंबू आणि पाण्याचा स्क्रब
साखर, लिंबाचा रस आणि थोडं पाणी मिसळून स्क्रब तयार करा. हे मिश्रण केस असलेल्या भागावर लावून १५-२० मिनिटांनी हलक्या हातांनी घासा. यामुळे केस पातळ होतात आणि त्यांची वाढ कमी होते.
अंडं, कॉर्नफ्लोर आणि साखरेचा पॅक
अंड्याचा पांढरा भाग, कॉर्नफ्लोर आणि साखर एकत्र करून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर वरून ओढून काढा. हे नैसर्गिक वॅक्सिंगसारखं काम करतं.
बटाटा आणि मसूर डाळ पेस्ट
मसूर डाळ रात्रीभर भिजवून दुसऱ्या दिवशी वाटा. त्यात किसलेला बटाटा मिसळा आणि पेस्ट बनवा. त्वचेवर लावा, सुकल्यावर हलक्या हातांनी घासा. हा उपाय केस हलके करतो आणि त्वचा उजळ बनवतो.
हळद आणि दूध पेस्ट
हळद आणि कच्चं दूध एकत्र करून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर धुवा. हलके, बारीक केस काढण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे.
ओट्स आणि केळ्याचा स्क्रब
पिकलेलं केळं मॅश करून त्यात ओट्स मिसळा. ही पेस्ट स्क्रबसारखी त्वचेवर वापरा. हा स्क्रब त्वचेला मऊ आणि तजेलदार ठेवत अनावश्यक केस हळूहळू कमी करतो.
