How to get rid off Underarm Smell : थंडी कमी होऊन आता ऊन चांगलंच वाढलं आहे. गरमी वाढली की, त्यासोबतच घामाच्या समस्याही वाढू लागतात. या दिवसांत जास्त मेहनत न करता देखील घाम येणं स्वाभाविक आहे. मात्र, घामाला दुर्गंधी येऊ लागली तर आत्मविश्वास कमी होऊ शकतो. ऑफिस, कॉलेज, रस्त्यावर किंवा गर्दीत उभं राहणंही अवघड वाटू शकतं. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल, तर खालील काही घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात.
उन्हाळ्यात घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी घरगुती उपाय
तुरटीचा वापर करा
तुरटीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. आंघोळीनंतर बगलांमध्ये थोडी तुरटी पावडर लावल्यास घाम थांबत नाही, पण त्याची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. अनेकजण याचा नैसर्गिक अँटी-पर्सपिरंटप्रमाणे वापर करतात. आंघोळीच्या पाण्यात थोडी तुरटी फिरवल्यानेही फायदा मिळतो.
बेकिंग सोड्याची पेस्ट
बेकिंग सोडा घाम शोषून घेण्यास आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करतो. अर्धा चमचा बेकिंग सोड्यात थोडं पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि बगलांमध्ये लावा. हे नैसर्गिक डिओडरंटसारखं काम करतं आणि दिवसभर ताजेपणा ठेवतं. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर बेकिंग सोड्यात खोबऱ्याचं तेल मिसळून वापरा.
गुलाबजल लावा
गुलाबजल त्वचेसाठी फायदेशीर असण्यासोबतच घामामुळे येणारी दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. कापसाने बगलांमध्ये लावा किंवा स्प्रेप्रमाणे वापरा. यामुळे हलका सुगंधही येतो आणि जंतूंची वाढही कमी होते. नियमित वापराने घामाची दुर्गंधी बरीच कमी होऊ शकते.
Web Summary : Beat summer sweat odor with these home remedies. Alum, baking soda, and rosewater can effectively combat underarm smell, keeping you fresh and confident all day long.
Web Summary : गर्मी में पसीने की दुर्गंध को इन घरेलू नुस्खों से मात दें। फिटकरी, बेकिंग सोडा और गुलाब जल बगल की दुर्गंध से प्रभावी ढंग से लड़ सकते हैं, जिससे आप पूरे दिन तरोताजा और आत्मविश्वास से भरे रहेंगे।