Join us  

Home Remedies For Hand Wrinkles : हाताची त्वचा खूप सैल पडलीये? २ सोपे उपाय, हातांवरच्या सुरकुत्या, काळपटपणा होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 2:12 PM

Home Remedies For Hand Wrinkles : बाजारात अनेक हॅण्ड क्रीम्स मिळतील. ज्या तुमच्या हातांच्या त्वचेला मॉइश्चरायझ करतील, परंतु त्वचेला घट्ट करण्यासाठी ते पुरेसे नाही. म्हणून, तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता, जे तुमचे हात सुंदर बनवण्यासाठी उपयुक्त ठरतील.

वाढत्या वयामुळे केवळ चेहऱ्याच्या त्वचेवरच परिणाम होत नाही तर हात आणि पायांच्या त्वचेवरही त्याचा परिणाम दिसून येतो. हात आणि पायांची त्वचा देखील सैल होऊ लागते. काही वेळा हात आणि पायांची त्वचा वयाच्या आधीच वयस्कर दिसू लागते. योग्य काळजी न घेणे हे त्याचे थेट कारण आहे. (Skin Care Tips)  वास्तविक, बहुतेक महिला चेहऱ्याच्या त्वचेकडे विशेष लक्ष देतात. या दरम्यान त्यांचे लक्ष हात आणि पायांच्या त्वचेकडे जात नाही. (Hand wrinkles treatment For Hand Wrinkles)

पाय  मोजे आणि शूजमध्ये झाकलेले असतात किंवा खूप कमी असल्यामुळे लोकांचे लक्ष तिकडे कमी असते, पण हात जास्त वापरात असतो, त्यामुळे लोकांची नजरही हातावर पडते. अशा स्थितीत जर तुमच्या हातांची त्वचा खराब दिसत असेल तर ते दिसायला खूपच वाईट दिसते. तुम्हाला बाजारात अनेक हॅण्ड क्रीम्स मिळतील. ज्या तुमच्या हातांच्या त्वचेला मॉइश्चरायझ करतील, परंतु त्वचेला घट्ट करण्यासाठी ते पुरेसे नाही. म्हणून, तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता, जे तुमचे हात सुंदर बनवण्यासाठी उपयुक्त ठरतील. (How to remove hand wrinkles)

हातांवर सुरकुत्या का येतात?

जर तुमच्या हाताची त्वचा खूप कोरडी असेल तर त्यामुळे लवकर सुरकुत्या पडू शकतात. जर तुम्ही केमिकलयुक्त हँड वॉश वापरत असाल तर हे देखील हातावर लवकर सुरकुत्या येण्याचे कारण असू शकते. हात नीट साफ न केल्याने हातावर सुरकुत्या येऊ शकतात आणि मृत त्वचा जमा होते. हातांचा व्यायाम केला नाही तर रक्ताभिसरण नीट होत नसल्यामुळेही हातावर सुरकुत्या पडतात.

हातांच्या सुरकुत्या घालवण्याचे उपाय

१) पपईचा गर आणि मध मिसळा. आता हे मिश्रण हातावर लावा. 15 मिनिटे कोरडे होऊ द्या आणि नंतर आपले हात धुवा.पपईमध्ये बीटा कॅरोटीन असते, जे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करते. तर मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.

उन्हामुळे खूप चिडचिड होते? रागावर कंट्रोल ठेवण्यासाठी १० टिप्स; डोकं, मन दोन्ही राहील शांत

२) तांदळाचे पीठ आणि गुलाबपाणी एकत्र करा. आता हे मिश्रण हातांच्या त्वचेवर लावा. 10 मिनिटांनंतर तुम्हाला दिसेल की मिश्रण सुकले आहे. नंतर साध्या पाण्याने हात धुवा.  हा घरगुती हॅण्ड पॅक हाताला लावल्यावर हातांची हालचाल थांबवा.

सुरकुत्या टाळण्यासाठी करा हे उपाय

1) जेव्हा तुम्ही उन्हात बाहेर जाल तेव्हा चेहऱ्यावर तसेच हाताला सनस्क्रीन लावा. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी हातमोजे घालण्याचा प्रयत्न करा. उन्हाळा आणि हिवाळा अशा दोन्ही ऋतूंसाठी बाजारात हातमोजे उपलब्ध आहेत.

चेहरा फार काळपट, निस्तेज वाटतोय? फक्त ४ घरगुती उपायांनी मिळवा ब्रायडल ग्लो

2) पाण्याचा जास्तीत जास्त वापर करा. जर त्वचा हायड्रेटेड राहिली तर त्यात कोरडेपणा राहणार नाही आणि जर कोरडेपणा कमी राहिला तर त्वचा घट्ट राहते. कोमट पाण्याने हात धुण्याऐवजी थंड पाण्याने हात धुवा. कोल्ड कॉम्प्रेसर त्वचेची छिद्रे दाबते. ज्यामुळे त्वचा घट्ट होते.

3) उन्हात बाहेर जाल तेव्हा चेहऱ्यावर तसेच हाताला सनस्क्रीन लावा.

घरात लाल मुंग्यांनी धुमाकूळ घातलाय; फक्त ५ उपाय, मुंग्यांची रांग होईल कमी

4) उन्हात बाहेर जाण्यापूर्वी हातमोजे घालण्याचा प्रयत्न करा. उन्हाळा आणि हिवाळा अशा दोन्ही ऋतूंसाठी बाजारात हातमोजे उपलब्ध आहेत. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी