आपला चेहरा चमकदार, ग्लोईंग दिसावा असं प्रत्येकालाच वाटतं पण काही कारणांमुळे त्वचेची काळजी घेणं प्रत्येकाला शक्य होत नाही. काही घरगुती उपाय करून तुम्ही सुंदर, नितळ त्वचा मिळवू शकता. चेहरा स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स वापरल्या तर तुमचं रूप खुलण्यास मदत होईल. (Home Remedies For A Glowing Skin)
१) लिंबू आणि मधाचा मास्क लावू शकता. लिंबात व्हिटामीन सी आणि मधात एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. दोन्ही पदार्थ मिसळून चेहऱ्याला लावल्यानंतर १५ ते २० मिनिटं तसंच ठेवा नंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. ज्यामुळे चेहरा चमकदार होण्यास मदत होईल. (Ref)
२) दूध दूधात लॅक्टिक एसिड असते ज्यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. हळदीत एंटी इफ्लेमेटरी गुण असतात जे त्वचेची सूज कमी करतात. हे दोन्ही पदार्थ मिसळून पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा.
३) एलोवेरा त्वचेला मॉईश्चराईज करते आणि त्वचेला हायड्रेट ठेवते. चेहरा स्वच्छ ठेवण्यासठी रोज एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होते.
४) ओटमील त्वचा एक्सफोलिएट करण्यास मदत करते. दह्यात लॅक्टिक एसिड असते ज्यामुळे त्वचा साफ राहते. या दोन्ही पदार्थांची पेस्ट तयार करून चेहऱ्याची हलक्या हातानं मालिश करा.
५) चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता जे खूपच फायदेशीर ठरतात. यात एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुण असतात. चेहऱ्याची मालिश करून चेहऱ्याला लावल्यानं चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होते.
६) गुलाब पाणी हा एक महत्वपूर्ण उपाय आहे. गुलाब पाण्यानं चेहरा धुतल्यास चेहरा चमकण्यास मदत होते.
७) चेहरा स्वच्छ करण्यासाठी पपईसुद्धा चांगला पर्याय आहे. पपई कुस्करून तो गर १५ मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवा. नंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा.
८) मुल्तानी माती त्वचेला आतून स्वच्छ करते. ज्यामुळे चेहऱ्याचं जास्तीचं तेल निघून जातं. गुलाब पाणी किंवा गुलाब जल मिसळून पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा.
९) कडुलिंबाच्या पानांत एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. कडुलिंबाची पानं वाटून ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानं चेहऱ्यावर ग्लो येतो.
