Which Is The Best Home Remedy For Dry Skin: हिवाळ्यात बदलत्या हवेमुळे त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या होतात. त्वचा कोरडी पडते, रखरखीत होते. अशात ड्राय स्किन म्हणजे त्वचा कोरडी पडण्याची समस्या कशी दूर करावी? असा प्रश्न अनेकांना पडतो. वेगवेगळे उपायही केले जातात, पण फायदा मिळतोच असं नाही. अशात आज आम्ही आपल्यासाठी ड्राय स्किनची समस्या दूर करण्याचे काही सोपे घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. हे उपाय केले तर आपल्याला महागचे प्रॉडक्ट्स घेण्याची गरजही पडणार नाही.
केळीची पेस्ट
जर तुम्ही ड्राय स्किनच्या समस्येमुळे त्रस्त असाल आणि अनेक उपाय करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसतील, तर एकदा केळीची पेस्टचेहरा खरखरीत-ड्राय झाला तर चटकन लावा घरातलेच ३ पदार्थ, चेहरा होईल मऊ-महागड्या क्रिमची गरजही नाही नक्की वापरून पाहा. यासाठी पिकलेले केळे सोलून नीट मॅश करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. सुमारे १ तासानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. ड्राय स्किनपासून आराम मिळवण्यासाठी हा एक उत्तम घरगुती उपाय आहे.
मका - ज्वारीचे पीठ
ड्राय स्किनपासून सुटका मिळवण्यासाठी स्वयंपाकघरात असलेले मक्याचे पीठ आणि ज्वारीचे पीठ एकत्र मिसळा. त्यात थोडीशी साय (मलाई) घालून चांगले मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर चेहरा धुवा. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते तसेच चांगले हायड्रेशनही मिळते.
खोबऱ्याचं तेल
ड्राय स्किनसाठी खोबऱ्याचं तेल फायदेशीर असल्याबद्दल तुम्ही अनेकदा वाचले असेल. हे पूर्णपणे खरे आहे. खासकरून हिवाळ्यात खोबऱ्याच्या तेलाचा वापर केल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. खोबऱ्याच्या तेलात नैसर्गिक फॅटी अॅसिड्स असतात, जे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात आणि त्वचा मऊ व मुलायम ठेवतात.
