Skin Care : उन्हाळ्यात उन्हामुळे आणि घामामुळे मानेवर-गळ्यावर काळे डाग पडणं ही एक कॉमन समस्या आहे. उन्हाळ्यात अनेकदा उपाय करूनही ही समस्या दूर होत नाही. कारण अनेकदा उन्हाच्या संपर्कात यावंच लागतं. मात्र, आता उन्हाळा जवळपास संपला आहे. मॉन्सूनला सुरूवात झाली आहे. त्यामुळे उन्हाचा जास्त त्रासही होणार नाही. अशात तुम्ही मानेवरील काळपटपणा (Neck Darkness) दूर करण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता. ज्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची सुद्धा गरज पडणार नाही.
बेकिंग सोडा आणि गुलाबजल
बेकिंग सोडा आणि गुलाबजलच्या मदतीनं तुम्ही मानेवरील आणि गळ्यावरील काळपटपणा दूर करू शकता. बेकिंग सोडा एक नॅचरल एक्सफोलिएटरसारखं काम करतो. हे त्वचेवर लावल्यानं डेड स्किन सेल्स सहजपणे दूर होतात. तसेच यात अनेक प्रकारचे अॅंटी-बॅक्टेरिअल गुणही असतात.
कसं लावाल?
बेकिंग सोडा आणि गुलाबजलची पेस्ट तयार करण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी एका बाउलमध्ये बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडं गुलाबजल टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेवर लावा आणि 2 ते 3 मिनिटांसाठी हलक्या हातानं मसाज करा. नंतर साधारण 10 मिनिटांसाठी पेस्ट तशीच राहू द्या. नंतर साध्या पाण्यानं धुवून घ्या. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.
बेसन, हळद आणि दही
त्वचेसाठी बेसन, हळद आणि दही खूप फायदेशीर असतं. या गोष्टी त्वचेसाठी खूप आधीपासून वापरल्या जातात. बेसन आणि दह्यानं त्वचा साफ आणि मॉइश्चराइज होते. तसेच दह्यानं त्वचा चमकदार होते.
कसं लावाल?
हे मिश्रण तयार करण्यासाठी आधी एका बाउलमध्ये दोन चमचे बेसन घ्या, त्यात चिमुटभर हळद टाका आणि एक चमचा दही टाका. याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेवर लावून काही वेळासाठी सुकू द्या. त्यानंतर हलक्या हातानं मानेवर मसाज करा. त्यानंतर पाण्यानं स्वच्छ करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यावर तुम्हाला फरक दिसून येईल.