Lokmat Sakhi >Beauty > लोण्यासारखी मऊ त्वचा पाहताच मैत्रिणी विचारतील लावतेस तरी काय ? पाहा पारंपरिक प्रभावी उपाय

लोण्यासारखी मऊ त्वचा पाहताच मैत्रिणी विचारतील लावतेस तरी काय ? पाहा पारंपरिक प्रभावी उपाय

home remedies for buttery soft skin, See the effective traditional remedies, homemade butter works like magic : त्वचेला लोणी लावण्याचे फायदे पाहा. पार्लरला जायची गरजच नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2025 13:18 IST2025-08-15T13:16:38+5:302025-08-15T13:18:16+5:30

home remedies for buttery soft skin, See the effective traditional remedies, homemade butter works like magic : त्वचेला लोणी लावण्याचे फायदे पाहा. पार्लरला जायची गरजच नाही.

home remedies for buttery soft skin, See the effective traditional remedies, homemade butter works like magic | लोण्यासारखी मऊ त्वचा पाहताच मैत्रिणी विचारतील लावतेस तरी काय ? पाहा पारंपरिक प्रभावी उपाय

लोण्यासारखी मऊ त्वचा पाहताच मैत्रिणी विचारतील लावतेस तरी काय ? पाहा पारंपरिक प्रभावी उपाय

अनेक अशा पारंपरिक पद्धती आहेत ज्या आता फार वापरल्या जात नाहीत मात्र त्या आरोग्यासाठी अगदी उत्तम आहेत. जसे की लोणी वापरणे. त्वचा लोण्यासारखी मऊ आहे अशी उपमा दिली जाते. (home remedies for buttery soft skin, See the effective traditional remedies, homemade butter works like magic )लोण्यासारखी त्वचा मिळवण्यासाठी लोणी वापरणे फायद्याचे ठरते. लोण्यामुळे त्वचा चिकट होते आणि तुपकट दिसते म्हणून हा उपाय फार कोणी करत नाही. मात्र योग्य पद्धतीने उपाय केला तर त्याचा तोटा नाही तर लाभच होतो. 

चेहर्‍याच्या आणि त्वचेच्या  लोणी लावणे हा नैसर्गिक उपाय आहे. घरीच केलेले ताजे, मीठ न घातलेले लोणी त्वचेला खोलवर पोषण देऊन मऊ आणि सुंदर ठेवण्यासाठी मदत करते. लोण्यात जीवनसत्त्व 'ए', 'डी', 'ई' आणि नैसर्गिक फॅट्स असतात. जे कोरडी आणि निस्तेज त्वचा पुन्हा तजेलदार करतात. विशेषतः हिवाळ्यात त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी लोणी उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझरचे काम करते. कोरडी त्वचा असणाऱ्यांनी लोणी नक्की वापरा. चेहर्‍यावर हलक्या हाताने लोणी लावून काही मिनिटे मसाज केल्यास रक्ताभिसरणही सुधारते. त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि सुरकुत्याही कमी होतात. 

लोणी लावण्याची योग्य वेळ म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर लगेच. कारण त्यावेळी त्वचा पोषक घटक चांगल्या प्रकारे शोषून घेते. अतिशय कोरड्या त्वचेसाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा लोणी लावणे फायदेशीर ठरते, तर सामान्य त्वचेसाठी आठवड्यातून एकदा पुरेसे असते. लोणी लावताना डोळ्यांच्या आजूबाजूला सौम्य मसाज केल्यास डार्क सर्कल्स आणि सूज कमी होण्यास मदत होते. मात्र, तेलकट किंवा मुरुम जास्त असेल तर त्वचेवर लोणी फायदेशीर ठरेलच असे नाही. 

लोण्यात असलेले घटक त्वचेसाठी चांगले ठरण्याचे कारण म्हणजे त्यातील नैसर्गिक फॅट्स, जीवनसत्वे आणि अँण्टी ऑक्सिडंट्स यांचे योग्य प्रमाण. त्यातील शक्तिशाली अँण्टी ऑक्सिडंट्स त्वचेतील वाढणारे मुक्त रॅडिकल्स कमी करतात. विविध प्रकारचे मॉइश्चराइझर्स वापरत असाल तर एकदा हा पारंपारिक मॉइश्चराइझर नक्की वापरुन पाहा.  

Web Title: home remedies for buttery soft skin, See the effective traditional remedies, homemade butter works like magic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.