प्रत्येकीलाच आपली त्वचा काचेसारखी स्वच्छ, उजळ आणि डागविरहित असावी असं वाटतं. पण वाढतं प्रदूषण, धूळ आणि ताणतणावामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स, आणि डेड स्किन जमा होणे ही आता एक कॉमन समस्या झाली आहे. इतकंच नाही तर, चेहऱ्यावरील बारीक अनावश्यक केस अनेकदा त्वचेची नैसर्गिक चमक कमी करतात. त्वचेच्या अनेक समस्यांपैकी या मुख्य समस्या आपला एकूणच लूक आणि त्वचेचे सौंदर्य बिघडवतात. या सगळ्या समस्यांपासून सुटका करण्यासाठी आपण वारंवार पार्लरमध्ये जातो, ज्याचा परिणाम काही काळापुरताच मर्यादित असतो. यासाठीच, घरच्याघरीच करता येणारे नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतात(how to remove blackheads, whiteheads, facial hair at home using face pack).
घरगुती फेसपॅक हे त्वचेतील घाण खोलवर स्वच्छ करून, डेड स्किन काढून टाकण्यास आणि त्वचेला नैसर्गिक उजळपणा देण्यास मदत करतात. काही साध्या, नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने तयार केलेले घरगुती फेसपॅक त्वचेची खोलवर स्वच्छता करून, मृत त्वचा काढून टाकतात आणि अनावश्यक केस हळूहळू कमी करण्यासही मदत करतात. यामुळे त्वचेला केवळ उजळपणाच नाही, तर एक नैसर्गिक, हेल्दी ग्लोही मिळतो. त्वचेवरील ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स, डेड स्किन आणि चेहऱ्यावरील अनावश्यक(home remedies for blackheads whiteheads & facial hair removal) केस कमी करण्यासाठी नेमका घरगुती सोपा उपाय काय, ज्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ, मऊ आणि चमकदार दिसेल ते पाहूयात...
साहित्य :-
१. साखर - १ टेबलस्पून
२. तांदूळ - १ टेबलस्पून
३. पाणी - १/२ कप
४. लिंबाचा रस - १/२ टेबलस्पून
५. खोबरेल तेल - १ टेबलस्पून
त्वचेच्या अनेक समस्यांवर एकच उपाय नेमका काय आहे ?
सर्वातआधी एका छोट्या पॅनमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून साखर आणि तांदूळ घेऊन ते २ ते ३ सेकंदांसाठी मंद आचेवर हलकेच भाजून घ्यावेत. त्यानंतर या मिश्रणात थोडं पाणी घालावं. साखर पाण्यांत विरघळून भात थोडा हलका मऊसूत शिजेपर्यंत मिश्रण गॅसच्या मंद आचेवर चमच्याने सतत हलवत रहावं. त्यानंतर मिश्रण बोटाला लावून थोडं चिकट झालं आहे का ते पाहावं. चिकट झाल्यावर गॅस बंद करुन हे तयार मिश्रण हलकंसं कोमट असतानाच मिक्सरच्या भांड्यात ओतावं. मिक्सरमध्ये मिश्रण फिरवून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. ही तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्यावी, फेसपॅक वापरण्यासाठी तयार आहे.
फेसपॅक कसा वापरायचा ?
या फेसपॅकची तयार पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून बोटांच्या मदतीने हलकेच चोळून २ ते ३ मिनिटे मसाज करावा. त्यानंतर हे मिश्रण हलकं कोरड होईपर्यंत त्वचेवर तसेच ठेवून द्यावं. ५ मिनिटांनीं हाताच्या पंजांनी आणि बोटांच्या मदतीने त्वचेवर खालून वरच्या दिशेने आणि गोलाकार पद्धतीने चोळून हलकेच मसाज करावा. यामुळे त्वचेवरील ब्लॅक आणि व्हाईट हेड्स, डेड स्किन अगदी सहज काढली जाते. इतकच नाही तर त्वचेवरील नको असलेले अनावश्यक केस देखील वॅक्सिंगच्या वेदना सहन न करता लगेच निघतात. याचबरोबर, त्वचेवर नॅचरल ग्लो देखील येतो.
हा फेसपॅक वापरण्याचे अनेक फायदे...
१. तांदूळ :- तांदळामध्ये 'अँटी-एजिंग' गुणधर्म असतात, जे त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. यातील पिष्टमय पदार्थ त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेतात आणि पोर्स घट्ट करतात. तांदूळ नॅचरल 'पिल - ऑफ' सारखे काम करते, ज्यामुळे चेहऱ्यावरील बारीक अनावश्यक केस मुळापासून निघण्यास मदत होते.
२. साखर :- साखर जेव्हा गरम केली जाते, तेव्हा ती नैसर्गिक 'ग्लू'प्रमाणे काम करते, जी ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स ओढून काढते. साखरेतील 'ग्लायकोलिक ॲसिड' डेड स्किन काढून टाकून त्वचेला आतून उजळवते.
३. लिंबाचा रस :- लिंबामध्ये व्हिटॅमिन 'सी' मुबलक प्रमाणात असते, जे त्वचेवरील काळे डाग आणि टॅनिंग कमी करण्यास मदत करते. लिंबाचा रस नॅचरल क्लिनर म्हणून काम करते, ज्यामुळे त्वचेवरील जंतू आणि घाण साफ होते. लिंबाच्या रसामुळे त्वचेला इन्स्टंट ग्लो मिळतो आणि त्वचा टवटवीत दिसते.
४. खोबरेल तेल :- खोबरेल तेल त्वचेला खोलवर ओलावा देते, ज्यामुळे पॅक काढल्यानंतर त्वचा मऊ आणि लवचिक राहते. खोबरेल तेलातील फॅटी ॲसिड्स त्वचेची जळजळ थांबवतात आणि नैसर्गिक चमक वाढवतात.
