सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे ज्यांचं लग्न असतं अशा नवरा- नवरीचे तर लग्नाच्या दिवशी छान दिसण्यासाठी विशेष प्रयत्न सुरूच असतात. पण त्यासोबतच त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींना, नातलगांना आणि त्यातही विशेषत: महिला वर्गाला आपलं सौंदर्य खुलून याचं अशी इच्छा असतेच. पण रोजच्या रोज त्वचेची म्हणावी तशी काळजी घेणं होत नाही. म्हणूनच आता हा एक सोपा उपाय करा. हा उपाय तुम्ही काही दिवस नियमितपणे केलात तरी अगदी ८ ते १० दिवसांत तुम्हाला त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल (home hacks for radiant glowing skin). त्वचेवरचे काळसर डाग, पिंपल्स, ॲक्ने जाऊन त्वचा स्वच्छ, नितळ आणि मुलायम झालेली जाणवेल (home hacks for glowing skin). बघा यासाठी नेमकं काय करायचं...(how to get glowing flawless skin)
त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी बडिशेप, वेलचीचा वापर
बडिशेप, वेलची आणि लवंग या काही घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेचं सौंदर्य कसं खुलविता येतं याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी drumangkhanna या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
फक्त काही मिनिटांत चमचमीत मिक्स व्हेज तयार... रेस्टॉरंटपेक्षाही भारी चव, घ्या एकदम सोपी रेसिपी
हा उपाय करण्यासाठी १ ग्लास पाणी एका पातेल्यामध्ये घ्या. त्यामध्ये १ चमचा बडिशेप २ हिरव्या वेलची आणि २ लवंग घाला. हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळवून घ्या. त्यानंतर ते गाळून घ्या आणि हे पाणी उपाशीपोटी प्या. हा सोपा उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहा. त्वचेचं सौंदर्य नक्कीच दिवसेंदिवस खुलत जाईल.
बडिशेप, वेलची आणि लवंगचा त्वचेवर नेमका काय परिणाम होतो?
बडिशेप, वेलची आणि लवंग हे तिन्ही पदार्थ असे आहेत जे अन्नपचन चांगलं होण्यास मदत करतात. शिवाय या पदार्थांमुळे मेटाबॉलिझमही चांगले होते. त्याचा चांगला परिणाम आपोआपच आपल्या त्वचेवर हळूहळू दिसायला लागतो.
केस गळून टक्कल पडण्याची वेळ आली? ७ पदार्थ खायला लगेच सुरुवात करा, केस गळणं थांबेल
लवंगमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक असतात. त्यामुळे पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. शिवाय बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, सी आणि ई चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळेही त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. वेलचीमध्ये बॉडी डिटॉक्स करण्याची क्षमता असते. त्यामुळे शरीरातले विषारी घटक शरीराबाहेर जातात आणि त्वचेवरची चमक वाढत जाते.
