हिरव्या वेलचीचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. ही वेलची फक्त चवीपुरता मर्यादित नाही तर याचा वापर जेवणात अनेक वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो.(Headaches issue) अनेकदा गोडाचे पदार्थ किंवा जेवल्यानंतर वेलची खाण्याची सवय अनेकांना आहे. वेलची ही फक्त आपल्या तोंडाची दुर्गंधी कमी करत नाही तर पचन देखील सुधारते.(acidity issues green cardamom)
हिरव्या वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत.(reduce acidity naturally at home) जे आपल्या शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. तसेच गॅस, अपचन, तोंडाची दुर्गंधी आणि आम्लता सारख्या समस्यांसमध्ये आराम देतात.(ayurvedic cure for frequent headache) रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि शरीरातील साखर सुरळीत ठेवण्यासाठी वेलचीचा उपयोग होतो. सध्या अनेकांना पोटाच्या समस्या, ताणतणाव आणि रक्तदाब सारख्या समस्यांचा त्रास होत आहे.(cardamom for better digestion) त्यामुळे जेवल्यानंतर एक वेलची खाणे अनेक आजारावर रामबाण ठरेल. पाहूया वेलची खाण्याचे आणखी फायदे (home remedies for gas and bloating)
जवस-तिळाची चटणी खा रोज, महिलांच्या सर्व आजारांवर गुणकारी! हाडांची दुखणी-बद्धकोष्ठतेचा त्रास होईल कमी
1. जेवल्यानंतर हिरवी वेलची खाल्ल्याने पचनसंस्थेला आराम मिळतो. यात असलेले एन्झाईम्स पचन सुधारण्यास आणि अन्न पचवण्यास मदत करतात. ज्यांना गॅस, अपचन किंवा पोटाची समस्या असेल त्यांनी नियमितपणे वेलची खायला हवी. वेलचीमध्ये असलेले घटक स्नायूंना आराम देते. तसेच अन्नपचायला मदत होते.
2. जर आपल्याला वारंवार पोटात गॅस, छातीत जळजळ किंवा ढेकर येत असेल तर हिरवी वेलची रामबाण आहे. यामुळे पोटातील आम्लता नियंत्रणात राहते. वेलचीमध्ये आढळणारे तेल नैसर्गिकरित्या गॅस बाहेर काढण्यास मदत करतात. ज्यामुळे पोट फुगलेले वाटत नाही. खाल्ल्यानंतर वेलची चावल्याने पोटाला थंडावा मिळतो, तसेच जळजळीपासून आराम मिळतो.
3. वजन कमी करणाऱ्यांसाठी वेलची फार उपयुक्त आहे. वेलचीमुळे चयापचय गतिमान करुन वजन कमी होते. यात असणारी संयुगे शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगाने करतात. तसेच भूक देखील नियंत्रणात राहते. याची चव आपला मूड आणि स्ट्रेस कमी करु शकते. यात असणारे अँटीऑक्सिडंट घटक मनाला शांत करण्यास मदत आहे.
4. वेलचीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर सारखे घटक असतात जे आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित करतात. रक्ताभिसरण सुधारुन हृदय निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहे. जर आपल्याला वारंवार डोके दुखीचा त्रास होत असेल वेलची चघळून खाल्ल्याने आराम मिळेल. मधुमेहाच्या रुग्णांसाठी वेलची आरोग्यदायी पर्याय आहे. परंतु याचे मर्यादित प्रमाणात सेवन करायला हवे.